डास तुमच्यापासून जातील दूर, फक्त ‘या’ नैसर्गिक गोष्टींनी घरी बनवा केमिकलमुक्त डासांचे क्रीम

बाजारात अनेक प्रकारचे मॉस्किटो क्रीम उपलब्ध आहेत. पण या मॉस्किटो क्रीममध्ये अनेक प्रकारच्या केमिकलचा वापर केलेला असतो. त्यामुळे यांच्या वापराने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने या काही गोष्टींनी घरच्या घरी केमिकलमुक्त डासांचे क्रीम बनवा.

डास तुमच्यापासून जातील दूर, फक्त या नैसर्गिक गोष्टींनी घरी बनवा केमिकलमुक्त डासांचे क्रीम
Mosquito
| Edited By: | Updated on: May 20, 2026 | 8:43 AM

उन्हाळ्यात संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. कारण उन्हाळ्यात जसजसं तापमान वाढतं तसतसं डासांचा प्रादुर्भाव वाढत जातो. ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं अनेकदा बाजारात मिळणाऱ्या कॉइल्स, स्प्रे किंवा डास प्रतिबंधक क्रीमचा वापर करतात. या सर्व प्रोडक्टमध्ये केमिकलचा वापर अधिक असतो. ज्यामुळे काहींना ॲलर्जीची समस्या निर्माण होते. कारण जळत्या कॉइलसोबत झोपणे आरोग्यासाठी विशेषतः हानिकारक आहे, तर डास प्रतिबंधक क्रीम देखील तुमच्या त्वचेला आणि आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. तर डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते नैसर्गिक घटक प्रभावी आहेत आणि तुम्ही घरीच केमिकलमुक्त डास प्रतिबंधक क्रीम तयार करू शकता.

ही घरगुती डास प्रतिबंधक क्रीम केवळ तुम्हाला डासांच्या चाव्यापासून वाचवणार नाही, तर ती तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये वापरलेले घटक फार महाग नाहीत, त्यामुळे तुम्ही ही क्रीम कमी खर्चात देखील बनवू शकता. चला तर मग ही क्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊयात.

डास प्रतिबंधक क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हे क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कोरफडीचा गर, सिट्रोनेला तेलाचे 5-6 थेंब (हे वगळू नका), कडुलिंबाच्या तेलाचे 7-8 थेंब किंवा अर्धा चमचा, लॅव्हेंडर तेलाचे 4-5 थेंब आणि एक स्वच्छ भांडे लागेल. तसेच 1 चमचा खोबरेल तेल घ्या.

क्रीम कशी बनवायची?

सर्वप्रथम एका वाटीत कोरफडीचा गर घ्या. त्यानंतर त्यात खोबरेल तेल टाकून गुळगुळीत होईपर्यंत चांगले फेटा. आता, त्यात कडुलिंबाचे तेल आणि सिट्रोनेला तेल मिक्स करा. शेवटी लॅव्हेंडर तेल घ्या आणि मिक्स करा. ही डास प्रतिबंधक क्रीम एका डब्यात साठवून ठेवा. उरलेले साहित्य जपून ठेवा. काही दिवसांनी ही क्रीम पुन्हा तयार करा.

या क्रीमचे दोन फायदे आहेत

लॅव्हेंडर तेलामुळे तुमच्या क्रीमला एक अद्भुत सुगंध येतो आणि ते त्वचेसाठी फायदेशीर आहे.

खोबरेल तेल देखील त्वचेचे पोषण करते.

कोरफड त्वचेला आर्द्रता देऊन मऊ करण्यास मदत करते.

सिट्रोनेला तेल आणि कडुलिंबाचे तेल डासांना दूर ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. डासांपासून संरक्षण आणि मऊ त्वचा हे या क्रीमचे दोन फायदे आहेत.

अशाप्रकारे करा त्वचेवर अप्लाय

ही क्रीम वापरण्याची सोपी पद्धत म्हणजे ते शरीराच्या उघड्या भागांवर, जसे की हात, पाय आणि मानेवर व्यवस्थित लावणे. जर तुमची मूलं बागेत खेळायला जाणार असेल, तर त्यांच्या त्वचेला हे क्रीम लावा. संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळी डासांपासून सावधगिरी बाळगणे विशेष महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की जरी क्रीममधील घटक नैसर्गिक असले तरी, आधी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे, कारण काही घटकांमुळे कधीकधी ॲलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us