
व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारीमध्ये 7-14 या कालावधीत साजरा केला जातो. प्रेम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप खास आहे. या आठवड्यात रोज डे पासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात. यानिमित्ताने लोक रोज आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देतात आणि तो क्षण खास बनवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करतात.
7 फेब्रुवारी रोज डे पासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होणार आहे. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फुले देऊन प्रेम व्यक्त केले जाते. पण हा दिवस तुमच्या जोडीदारासाठी खास बनवण्यासाठी तुम्ही गुलाब देण्यासोबतच आणखीन काही भेटवस्तू देऊ शकता. रोजचा डेला खास बनवण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स.
फुल देण्या सोबतच सुंदर संदेश देणे हे आणखीन खास ठरते. तुम्ही तुमच्या मनातील भावना काही शब्दात व्यक्त करू शकता तुम्ही तुमचा जोडीदारासाठी काव्यात्मक शैलीत काहीतरी लिहू शकता. जसे की तुझे हास्य माझा दिवस उजळवते आणि तुझी उपस्थिती माझे जीवन सुंदर बनवते. जे वाचल्यानंतर तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर नक्कीच एक गोड हसू येईल.
रोज डे स्पेशल बनवण्यासाठी केवळ गुलाबाचे फुल आणि भेटवस्तू देणे महत्त्वाचे नाही तर एकमेकांसोबत वेळ घालवणेही महत्त्वाचे आहे. एकत्र वेळ घालवल्याने तुमचे नाते आणखीन घट्ट होण्यास मदत होईल. तुम्ही रात्री जेवणासाठी सोबत जाऊ शकता. तुमच्या जोडीदाराच्या आवडत्या कॅफेमध्ये जाऊन तिथे चहा, कॉफी घेऊ शकतात किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाबाच्या फुलांनी सरप्राईज देऊ शकता. तुम्ही एखादी छोटी भेट किंवा रोमँटिक डेट प्लॅन करू शकता तसेच एका छानसा दागिना, फोटो फ्रेम, एखादे पुस्तक तसेच तुमच्या जोडीदाराच्या छंदाशी संबंधित एखादी भेट देऊ शकता. जर तुमच्याकडे काही वेळ असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने एक कार्ड तयार करून तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना शब्दातून व्यक्त करू शकतात.
जर काही कारणास्तव या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटायला जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करू शकता. एक सुंदर फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करून तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवू शकता की ते तुमच्यासाठी किती खास आहे.