AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त गुलाबच नाही तर ‘ही’ फुले चेहरा चमकदार बनवतील, जाणून घ्या

फुलांचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठीही केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे अनेक जण टोनरप्रमाणे चेहऱ्यावर गुलाबजल लावतात, त्याचप्रमाणे या फुलांनी फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

फक्त गुलाबच नाही तर 'ही' फुले चेहरा चमकदार बनवतील, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 05, 2025 | 3:39 PM
Share

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजच्या काळात प्रदूषण, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खराब आहार यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. आजकाल लोकं आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेचे विविध उपचार घेतात. त्याचबरोबर अनेकांना त्यांचा चेहरा नैसर्गिक पद्धतीने चमकवायचा असतो. यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतात.

चेहरा चमकदार करण्यासाठी गुलाबजल खूप फायदेशीर आहे. बरेच लोकं गुलाबजल टोनर म्हणून त्वचेवर लावतात. त्याचबरोबर गुलाबाप्रमाणे आणि इतर काही फुले आहेत जी तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार करण्यास मदत करतात. त्यापासून तुम्ही नॅचरल फेसपॅक बनवू शकता. ही फुलं तुमची त्वचा हेल्दी तसेच चमकदार ठेवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊयात कोणती फुलं आहेत जी त्वचा चमकदार आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

गुलाबाचे फुल

आपल्यापैकी अनेकजण चेहऱ्यावर गुलाबपानायचा वापर टोनर म्हणून करतात. पण याव्यतिरिक्त गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर तुम्ही फेस मास्क बनवून देखील चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होण्यास मदत होते. गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक बनवण्यासाठी गुलाबाच्या २ ते ३ पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये मध आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसेल.

झेंडूचे फुल

झेंडूच्या फुलांचा वापर पूजेसाठी किंवा घर सजवण्यासाठी आपण नेहमी करत असतो. पण तुम्ही कधी झेंडूच्या फुलांचा वापर चेहरा चमकदार ठेवण्यासाठी केला आहे का? दरम्यान झेंडुच फुल चेहऱ्यावर चमक टिकवून ठेवण्यास देखील मदत करू शकतात. झेंडूच्या फुलांचा फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम झेंडूची फुले पाण्याने धुवून घ्या. नंतर रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता त्यात दही आणि चंदन पावडर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते २० मिनिटे लावल्यानंतर पाण्याने धुवून टाका. दह्याऐवजी गुलाबपाणी ही मिसळू शकता. अश्याने तुमची त्वचा हेल्दी राहील.

चमेलीचे फुल

चमेलीच्या फुलांपासून तुम्ही फेस मास्क देखील तयार करू शकता. ते बनवण्यासाठी ६ ते ८ चमेलीची फुले बारीक करून पेस्ट तयार करावी. आता त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. या फुलाचे फेस पॅक त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...