नवीन वर्षाच्या सुरुवातीला करा हे 5 सौंदर्य संकल्प, वर्षभर तुमची त्वचा राहील चमकदार

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. नवीन वर्षाच्या सुरूवातील अनेक लोकं नवीन संकल्प करतात. तुम्ही या नवीन वर्षात हे पाच सौंदर्य संकल्प देखील करू शकता, जे वर्षभर तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राखण्यास मदत करतील.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला करा हे 5 सौंदर्य संकल्प, वर्षभर तुमची त्वचा राहील चमकदार
skin tips new year
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 3:02 PM

नवीन वर्ष हे आपल्या सर्वांच्या जीवनात एक नवीन संधी घेऊन येतं. कारण नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण नवीन सकंल्प करत असतात. जसे की फिटनेस, अभ्यास किंवा करिअरसाठी संकल्प करतात. तुम्हीही या नवीन वर्षात एक चांगल ध्येय गाठण्यासाठी संकल्प करत असाल तर त्यात सोबत त्वचेसाठी आणि सौंदर्यासाठी सकारात्मक संकल्प करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. धावपळीची जीवनशैली, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, ताणतणाव आणि प्रदूषण यांचा आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. म्हणून योग्य सौंदर्य संकल्पांनी वर्षाची सुरुवात केल्यास वर्षभर निरोगी, चमकदार आणि फ्रेश त्वचा मिळू शकते.

नवीन वर्षासाठी छोटे सौंदर्य संकल्प केल्याने तुमची त्वचा तर सुधारेलच पण तुमचा आंतरिक आत्मविश्वासही वाढेल. तर चला पाच सोपे आणि प्रभावी सौंदर्य संकल्प जाणून घेऊयात जे तुम्हाला वर्षभर निरोगी आणि चमकदार त्वचा राखण्यास मदत करू शकतात.

1. दररोज त्वचेची काळजी घ्या

नवीन वर्षासाठी तुमचा पहिला संकल्प हा असला पाहिजे की कधीही त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष करू नका. आळस आणि वेळेअभावी अनेक महिला त्वचेच्या काळजीबद्दल विसरून जातात. तथापि निरोगी त्वचेसाठी दिवसातून दोनदा त्वचेची स्वच्छता करणे, टोनर आणि मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. शिवाय दिवसभरात त्वचेवर साचलेली सर्व घाण आणि धूळ काढून टाकण्यासाठी झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. सीरम लावणे देखील पुरेसे आहे.

2. सनस्क्रीन लावण्याची सवय करा

उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा केवळ हानिकारक नसतो; तर हिवाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो. तर बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्याचा संकल्प करा. ते त्वचेला टॅनिंग, डाग आणि अकाली सुरकुत्या यांपासून वाचवण्यास मदत करते. एनसीबीआयच्या मते, सनस्क्रीन हानिकारक अतिनील किरणांना आपल्या त्वचेत प्रवेश करण्यापासून रोखते. सनस्क्रीनमध्ये असलेले टायटॅनियम डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साईड सारखे अजैविक सनस्क्रीन जे अतिनील किरणांना रोखते.

3. निरोगी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करा

सुंदर त्वचेचे रहस्य फक्त क्रीम आणि फेसवॉशमध्येच नाही तर योग्य आहारातही आहे. या वर्षी तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि निरोगी पदार्थांचा समावेश करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प करा. दिवसभर भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे, कारण तुमचे शरीर जितके जास्त हायड्रेटेड असेल तितकी तुमची त्वचा चमकेल. तुमच्या त्वचेसाठी व्हिटॅमिन सी, ई आणि डी देखील आवश्यक आहेत. हे साध्य करण्यासाठी, तुमच्या आहारात या जीवनसत्त्वांनी समृद्ध फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तसेच जंक फूडपासून दूर रहा.

4. चांगली झोप घ्या

जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर चांगली झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आजकाल मोबाईल फोनच्या वापरामुळे आपल्यापैकी अनेक जण उशिरा झोपतात, जे डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याचे एक प्रमुख कारण आहे. म्हणून तुम्ही लवकर झोपाण्याचा पर्यंत करा आणि दररोज 7 ते 8 तास झोप घ्यावी.

5. नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून रहा

आपण प्रत्येकजण आपली त्वचा निरोगी आणि चमकदार रहावी यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. मात्र हे प्रोडक्ट त्वचेला काळांतराने नुकसान पोहोचवू शकतात. या वर्षी तुम्ही महागड्या आणि केमिकल उत्पादनांऐवजी घरगुती उपचारांवर अवलंबून राहण्याचा संकल्प करू शकता, जसे की चंदन पावडर, दही आणि मुलतानी मातीपासून बनवलेला फेस पॅक किंवा नारळ आणि कोरफडीच्या जेलपासून बनवलेला सीरम.

त्वचेसंबंधीत हे संकल्प तुम्ही नियमित पाळल्यास तुमची त्वचा वर्षभर चकमत राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)