सावधान! तुमच्या औषधांच्या पाकिटावरही ‘लाल रेघ’ आहे? जाणून घ्या तिचा नेमका अर्थ…

| Updated on: Dec 14, 2020 | 2:42 PM

औषधांच्या नावासह आरएक्स, एनआरएक्स सारखे कोडकडे कधी आपले लक्ष गेले आहे का? आपल्याला औषधाच्या पाकीटावरची लाल रेघ लक्षात आली आहे का?

सावधान! तुमच्या औषधांच्या पाकिटावरही ‘लाल रेघ’ आहे? जाणून घ्या तिचा नेमका अर्थ...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : आपण कधी औषधांच्या पाकिटावरचा (medicine tablet strip) इशारा पहिला आहे का? त्याशिवाय औषधांच्या नावासह आरएक्स, एनआरएक्स सारखे कोडकडे कधी आपले लक्ष गेले आहे का? आपल्याला औषधाच्या पाकीटावरची लाल रेघ लक्षात आली आहे का?  उत्तर कदाचित नाही असे असेल. मात्र, आपण नजरअंदाज करत असलेल्या या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही याबाबत इशारा दिला आहे (Meaning of rx, nrx, xrx code and Red line on medicine tablet strip).

वास्तविक, खाण्यापिण्यापासून ते उठणे-धावणे यासारख्या कामांमधील निष्काळजीपणा आपल्याला आजारी पाडू शकतो. जर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर, हंगामी आजार किंवा विषाणूजन्य संसर्ग याचा धोका अधिक असतो. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, पोटदुखीसारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांकडे आपण गांभीर्याने पाहत नाही.

अशावेळी डॉक्टरांकडे जाणे किंवा त्यांच्याकडून सल्ला घेणे बरेच लोक टाळतात. त्याऐवजी, घरी असलेल्या औषधांपैकी एखादे औषध खाल्ले जाते किंवा थेट जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली जाते. मेडिकल स्टोअरमध्ये अनुभवी किंवा ज्ञानी व्यक्ती नसली तरीही, आपण कोणतेही औषध विचार न करता घेतो आणि खातो. बर्‍याच वेळा या औषधाने लोक बरे होतात, तर बर्‍याच वेळा त्यांना गंभीर दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. अशावेळी औषधाच्या पाकीटांवरील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे, सौम्य किंवा गंभीर दुष्परिणामांचे कारण ठरते.

बऱ्याच वेळा आपण औषधांच्या पाकीटावर लक्ष देत नाही. परंतु, या औषधांच्या पाकीटांवर लाल रंगाची रेघ दिसते. या रेघेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टर, फार्मासिस्ट आणि तज्ज्ञांच्या तुलनेत सामान्य लोकांना याबद्दल माहिती नसते. अशा परिस्थितीत, सामान्य लोक औषध विकत घेतात व त्याचे सेवन करतात आणि गंभीर आजारी पडतात (Meaning of rx, nrx, xrx code and Red line on medicine tablet strip).

लाल रेघेचा अर्थ काय?

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, औषधाच्या पाकीटांवर लाल रंगाची रेघ असणे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषध विकणे अथवा त्यांचे सेवन करणे प्रतिबंधित असते. फार्मासिस्ट चंदन साह यांच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर रोखण्यासाठी केवळ औषधांच्या पाकीटावर लाल रंगाची पट्टी आठ रेघ लावली जाते. औषध विक्रेत्याने देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषध विक्री करु नये.

आरएक्स (Rx) म्हणजे काय?

लाल रेघ केवळ औषधांचा गैरवापर रोखण्यासाठीचे चेतावणी देत ​​नाही. तर, या व्यतिरिक्त औषधांच्या पाकीटावर इतरही अनेक उपयोगी गोष्टी लिहिलेल्या असतात, ज्याबद्दल सामान्य लोकांना माहिती नाही. अनेक औषधांच्या पाकीटावर आरएक्स लिहिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की, असे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे (Meaning of rx, nrx, xrx code and Red line on medicine tablet strip).

एनआरएक्स (NRx) आणि एक्सआरएक्स (XRx) म्हणजे काय?

बर्‍याच औषधांच्या पानांवर एनआरएक्स हा कोड लिहिलेला असतो. ज्याचा अर्थ असा आहे की, ही औषधे घेण्याची परवानगी फक्त असेच डॉक्टर देऊ शकतात, ज्यांना या औषधांची विक्री करण्यास परवाना मिळाला आहे. काही औषधांच्या पाकीटावर एक्सआरएक्स देखील लिहिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की, अशा औषधे केवळ डॉक्टरच देऊ शकतात. जरी डॉक्टरांनी लिहून दिले तरी, ती औषधे मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येत नाही.

(Meaning of rx, nrx, xrx code and Red line on medicine tablet strip)