
आजकाल एकटे राहण्याचा मार्ग देखील अनेक तरुण आणि तरुणी निवडत आहेत. कारण विवाहामुळे त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल असे त्यांना वाटत आहे.त्यांना त्यांच्या जीवनाचा आनंद म्हणजे एखाद्या विकेण्डला कोणत्याही कटकटशिवाय मित्रांसोबत पार्टी करीत एन्जॉय करणे यालाच महत्व आले आहे. परंतू प्रत्येक पुरुष असा विचार करीत नाही. तरीही बऱ्याच लोकांना आता कमिटमेंट नको आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे जे पुरुष लग्नापासून दूर पळत असतात. ते देखील एका क्षणी राजीखुशी या लग्नाच्या बेडीत स्वत:हून अडकण्यासाठी एका पावलावर तयार होताना दिसतात. अखेर असे काय असते की पुरुष लग्नासाठी मोटीव्हेट होतात ? या मागची कारणे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
पुरुष यासाठी लग्न करतात की त्यांना कधीच प्रेमाची उणीव भासू नये आणि जीवनभर एक विश्वासार्ह साथीदार मिळावा. वास्तविक हे लग्न करण्याचे सर्वात बेसिक कारण आहे. त्यामुळे महिला देखील विवाहासाठी प्रेरित होत असतात. कारण लग्न ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी दोन प्रेमाने भारलेल्या दोन जीवांना एकत्र रहाण्यासाठी प्रेरित करते.तसेच एकट्याने जीवनातील प्रत्येक मोसमातून प्रवास करणे खूपच कठीण आणि दुखदायी असते. अशात एकटे राहण्याची भीती देखील पुरुषांना लग्नासाठी प्रेरणा देत असते.
अनेकदा पुरुष केवळ यासाठी लग्नासाठी तयार होतात, कारण ते घर, समाज वा प्रेयसीच्या वारंवार सेटल होण्याच्या सल्ल्यांनी कंटाळून जातात. त्याशिवाय त्यांना कधीच वाटत नाही की लग्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे दुसऱ्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करणारे पुरुष आपल्या वैवाहिक जीवनाला सर्वसाधारणपणे एन्जॉय करु शकत नाहीत.
महिलांनासाठी मुल दत्तक घेणे किंवा सिंगल पेरेंट बनणे खूपच सोपे आहे. परंतू पुरुष असे करु शकत नाही. पुरुषांना आपले कुटुंब तयार करण्यासाठी नेहमीच महिलेची गरज असते, जी कायदेशीररित्या त्याची पत्नी असेल.अशात ज्या पुरुषांना मुलं आवडतात, आणि जे नेहमी आपल्या छोट्या कुटुंबाचे स्वप्न पाहात असतात, त्यांना लग्न करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही.
‘डीबंकिंग द बॉल एंड चेन मिथ ऑफ मॅरिज फॉर मॅन’ नावाच्या एका अभ्यासानुसार लग्न झालेले पुरुष सिंगल रहाणार्या पुरुषांपेक्षा जास्त कमवितात आणि अधिक बचत करतात. या अभ्यासात असेही स्पष्ट झाले आहे की लग्न झालेल्या पुरुषाची कमाई १० -२४ टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच कायदेशीर रित्या देखील लग्न झालेल्या व्यक्तीला अनेक फेड्रल बेनिफिट्स देखील मिळतात.
पुरुष महिलांच्या तुलनेत कंमी इमोशनल असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पॉवर आणि त्यांचे स्टेटस खूप महत्वाचे असते. ते लग्न देखील यासाठी करतात की ते आपल्या कुटुंबाच्या लाईफस्टाईलने आपले स्टेटस दाखवू शकतील आणि त्याला वाढवू शकतील.