Wine whiskey beer
Image Credit source: Tv9 Network
लोक नशेसाठी विविध प्रकारे प्रयत्न करतात. बिअरनंतर व्हिस्की किंवा वाईन पिण्याचे प्रकार करतात. यामुळे नशेचा आनंद तर मिळतो, पण त्यानंतरची परिस्थिती अडचणीची ठरू शकते. कोणत्याही प्रमाणात दारूचे सेवन आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. अशा परिस्थितीत, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॉकटेल पिणे किती धोकादायक ठरू शकते, हे जाणून घेऊया.
कशाप्रकारे आहे धोकादायक?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दारू मिसळून पिणे ही सामान्य बाब आहे, परंतु याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही. प्रत्येक प्रकारच्या दारूत अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे असते, त्यामुळे त्याचा परिणामही वेगळा होतो. उदाहरणार्थ, बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, तर व्हिस्की किंवा वाईनमध्ये जास्त असते. जर एखादी व्यक्ती आधी बिअर पिते, तर नशेचा परिणाम हळूहळू जाणवतो. त्यानंतर व्हिस्की प्यायल्यास नशा झपाट्याने चढते. अशा परिस्थितीत शरीरावरील नियंत्रण सुटू शकते. पाय डगमगतात आणि विचार करण्याची व समजण्याची क्षमता कमी होते. याचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो.
वाचा: हार्ट फेल होण्याआधी शरीर महिनाभर आधी कोणते संकेत देतात? जाणून घ्या 7 लक्षणे
कॉकटेलमुळे उद्भवणाऱ्या समस्या
- हँगओव्हर: एकापेक्षा जास्त प्रकारच्या दारू मिसळून प्यायल्याने दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकं फुटतंय असं वाटू शकतं.
- पचनाच्या समस्या: दारू पचनसंस्थेवर परिणाम करते. एकापेक्षा जास्त दारू मिसळून प्यायल्याने गॅस, अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- शारीरिक नियंत्रण सुटणे: जर एखादी व्यक्ती फक्त बिअर पिते आणि त्यानंतर दुसरी दारू प्यायली, तर नशेचा अंदाज येत नाही. यामुळे व्यक्ती शरीरावरील नियंत्रण गमावते.
- यकृतावर परिणाम: दारू मिसळून पिण्याचा परिणाम यकृतावर होतो. यकृताला वेगवेगळ्या विषारी द्रव्यांचा एकाच वेळी सामना करावा लागतो, ज्यामुळे यकृतावर दबाव वाढतो. सातत्याने अशी परिस्थिती राहिल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते.
अल्कोहोलमुळे होणारे नुकसान
- स्मरणशक्तीवर परिणाम: दारूच्या सेवनाने उदासीनता, चिंता आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो आणि निर्णयक्षमता कमकुवत होते. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
- हृदयावर परिणाम: दारूच्या सेवनाने रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. हृदयाचे ठोके अनियमित होऊन हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
- यकृत खराब होणे: दारूचा यकृतावर परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. याकडे दुर्लक्ष केल्यास हिपॅटायटिस आणि सिरोसिससारख्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- कर्करोगाचा धोका: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दारूला ग्रुप 1 कार्सिनोजेनमध्ये समाविष्ट केले आहे. यामुळे स्तन, आतडे, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि यकृतात कर्करोगाचा धोका वाढतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)