
Money Plant Vastu: वास्तू शास्त्रामध्ये मनी प्लँट अत्यंत शुभ मानल्या जाते. जिथे हा छोटे झाडं असतं. तिथे सुख, समृद्धी आणि संपत्ती नांदते. तिथे कसलीही कमी पडत नाही. अर्थात मनी प्लँट कुठे लावावा याविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्याविषयीच्या अनेक धारणा प्रचलित आहेत. त्यातील अजून एक मान्यता तर एकदम हटके आहे. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या अथवा समृद्धी असलेल्या घरातून मनी प्लँट चोरून आणला आणि तो आपल्या घरात लावला तर मोठा धनलाभ होतो असा हा समज आहे. अशी मान्यता आहे की हे रोपटं जर चोरून लावलं तर लवकर श्रीमंत येते. पण वास्तू शास्त्रात याविषयीची वेगळीच माहिती आहे. वास्तू शास्त्रात याविषयी काय सांगितले आहे नियम?
वास्तूशास्त्रानुसार घरातील काही रोपटी ही सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देतात. मनी प्लँट हा त्यातीलच एक आहे. हे झाड वातावरणात सकारात्मकता आणते. यामुळे घरात पैसा, धन, समृद्धी येते. घरात आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये मनी प्लँट असेल तर सुख समृद्धी आपसूकच पायाशी लोळण घेते अशी धारणा आहे. अशी अनेकांची मान्यता आहे.
मनी प्लँट चोरून लावावे का?
अनेक लोक मानतात की मनी प्लँट चोरी करुन तो आपल्या घरात लावल्यास धनलाभ होतो. पण वास्तूशास्त्रानुसार हा विचार चुकीचा आहे. चोरी कोणत्याही प्रकारची असो ती वाईटच असते. तुम्ही समृद्धी यावी म्हणून जरी एखाद्याच्या घरून मनी प्लँट चोरून आणत असाल तरी ही पद्धत चुकीची मानल्या जाते. वास्तू शास्त्रानुसार असा मनी प्लँट हा सकारात्मकतेचा नाही तर नकारात्मकतेचा भाग होतो. असे चोरून आणलेला मनी प्लँट हा घरात सुख-समृद्धी आणतनाही तर आर्थिक अडचणीचे कारण ठरतो.
खरेदी करून लावल्यास चांगली फळं
वास्तूशास्त्रानुसार, जर मनीप्लँट बाजारातून खरेदी करून घरी आणल्यास आणि योग्य ठिकाणी तो लावल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. असे करणे फायद्याचे ठरते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. लक्ष्मीची कृपा होते. मनी प्लँट घरी आणून लावण्याची वेळ एकतर सकाळची अथवा संध्याकाळची योग्य मानली जाते. शुक्रवारी मनी प्लँट लावणे फायदेशीर मानल्या जाते. मनी प्लँट लावताना एक काळजी घेणे आवश्यक आहे. हा मनी प्लँट जमिनीला टेकता कामं नाही. तो वरच्या दिशेने वाढायला हवा.
(डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती ही सामान्य गृहितं आणि उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. टीव्ही9 मराठी त्याला दुजोरा देत नाही.)