SIP मधून व्हा करोडपती; किती दिवस लागतील? समजून घ्या सोप्पं गणित
Mutual Fund SIP : श्रीमंत व्हावं, करोडपती व्हावं असं कुणाला वाटत नाही, पण त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. स्मार्टली गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. दर महिन्याला इतकी रक्कम जर मागे टाकली तर तुम्ही करोडपती जरूर होणार.

प्रत्येकाला श्रीमंत व्हावं. करोडपती व्हावं असं वाटतं. पण त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक केली तर एक दिवस श्रीमंत व्हाल. पण त्यासाठी गुंतवणूक कुठे करावी आणि कशी करावी हे गणित समजून घ्यावं लागेल. दरमहा एक रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली तर तुम्हाला साधारणतः 20 वर्षांमध्ये करोडपती होता येईल. त्यासाठी दरमहा खंड न पाडता हा प्रयोग राबवावा लागेल. म्युच्युअल फंड हा सध्या गुंतवणुकीचा लोकप्रिय प्रकार आहे. सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडलेला असताना दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. तुम्हाला हे गणित फायदेशीर ठरेल.
कसं व्हावं करोडपती ?
जर भविष्यात तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर म्युच्युअल फंडात SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येईल. SIP द्वारे तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम दीर्घ काळ गुंतवून मोठा फंड तयार करू शकता. त्यासाठी सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध फॉर्म्युला वापरता येईल. 11x12x20, हा फॉर्म्युला गुंतवणूकदारांना कोरडपती करेल. हा फॉर्म्युला करोडपती होण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा लॉटरी प्रमाणे नशीबाचा खेळ नाही तर गुंतवणुकीचे एक खास धोरण आहे. त्याला स्मार्ट फायनेन्शिल प्लॅनिंग असे म्हणतात. ही योजना तुम्हाला श्रीमंतीचा मार्ग दाखवेल.
काय आहे करोडपती होण्याचा फॉर्म्युला?
11x12x20 मध्ये सुरुवातीचे 11म्हणजे 11,000 रुपयांची दरमहाची SIP
12 चा अर्थ आहे 12% अंदाजित वार्षिक परतावा
20 चा अर्थ आहे, पुढील 20 वर्षांसाठीची गुंतवणूक
या फॉर्म्युलाचा पहिला नियम हा नियमित गुंतवणूक आणि आर्थिक शिस्तीचा आहे. गुंतवणूकदारांना दरमहा 11,000 रुपयांची एसआयपी करावी लागेल. म्हणजे प्रत्येक दिवशी 367 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. रोजची ही बचत तुम्हाला पुढील 20 वर्षांत करोडपती करेल. जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल. तितका तुम्हाला अधिक फायदा होईल.
तर 12% परतावा कुठे मिळेल?
12 टक्क्यांचा परतावा मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजनेत मिळणे अशक्य आहे. त्यासाठी तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. दीर्घकाळासाठी चांगला लार्जकॅप (Large-cap) आणि फ्लेक्सी-कॅप (Flexi-cap) फंड्सने सरासरी 12% ते 15% टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या फॉर्म्युलात सर्वात महत्त्वाचा घटक वेळ हा आहे. 20 वर्षांपर्यंत तुम्ही खंड न पडू देता गुंतवणूक केली तर कम्पाऊंडिंगचा फायदा तुम्हाला मिळतो. व्याजावर व्याजाचा फायदा मिळतो.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
