Liquor Stock : या दारु कंपन्यांमुळे गुंतवणूकदार मालामाल; या शेअरने तर दिला 7 पट नफा
Liquor Multibagger Stock : मद्यविक्री करणाऱ्या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांसाठी पैसे छापायची मशीन ठरत आहेत. गेल्या 3 वर्षात या 4 खास स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 654% पर्यंतचा भरघोस परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Top Alcohol Stock : भारतीय शेअर बाजारातील काही सेक्टर असे आहेत की ते चर्चेत नाहीत. पण त्यांच्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. गेल्या काही वर्षांमध्ये दारु, मद्य (Alcohol) या सेक्टरने असाच धडाका लावला आहे. भारतात गेल्या काही वर्षात मद्य व्यवसायाने चांगलाच वेग धरला आहे. मध्यमवर्गात एक उच्च वर्ग तयार झाला आहे. काही लोक ही मध्यम श्रीमंतांच्या यादीत गेली आहे. एक नवीन वर्ग तयार होत आहे. त्यामुळे प्रीमियम ब्रँड्सची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे इथेनॉल आणि बायोफ्युएल धोरणामुळे या क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे.
केवळ बिअर,वाईनच नाही तर इंडस्ट्रियल अल्कोहलपर्यंत अनेक क्षेत्रात कंपन्यांना फायदा होत आहे. या दमदार वाढीमुळे भट्टीतील दारू असो वा डिस्टिलरी सेक्टरमधील काही कंपन्यांना गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 654 टक्क्यांपर्यंत जोरदार परतावा दिला आहे.
ब्रँडेड मद्य विक्री कंपन्या जोशमध्ये
भारतात बेव्हरेज बाजार मोठा आहे. 2021 मधील आकडेवारीनुसार, हा बाजार जवळपास 52 अब्ज डॉलर (जवळपास 4,61,708 कोटी) इतका आहे. तर सध्याची त्याची गती पाहता हा बाजार लवकरच 64 अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो. इथेनॉल धोरणांमुळे यामध्ये मोठा बदल झाला आहे.
सरकारने 2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकण्याचे (E20) धोरण आखले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथेनॉलची गरज असते. ते तयार करण्याचे काम या डिस्टिलरी कंपन्या करत आहेत. बायोफ्युएलची मागणी वाढल्याने या क्षेत्राला त्याचा फायदा होत आहे. कंपन्यांना दोन्हीकडून नोटा छापता येत आहे. अल्कोहल (Beverage) आणि इंडस्ट्रियल अल्कोहल (Ethanol) या दोन्हीचा कंपन्यांना फायदा होत आहे.
हे आहेत मल्टिबॅगर शेअर
मद्य कंपन्यांमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर ‘तहमर इंटरप्राइजेज’ (Tahmar Enterprises) आहे. ही कंपनी धान्यापासून दारु तयार करते. यामध्ये एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहल (ENA), IMFL (भारतात उत्पादित परदेशी मद्य) आणि फार्मा ग्रेड सॉल्वेंट्स याचा समावेश आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 188 कोटी रुपये इतके आहे. तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 654 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
‘विंसम ब्रुअरीज’ (Winsome Breweries) दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या बिअर बाजारात कंपनीची जवळपास 20 टक्के वाटा आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 80 कोटी रुपये आहे. तीन वर्षांत कंपनीने 226% परतावा दिला.
‘रेडिको खेतान’ (Radico Khaitan) हा देशातील मास्टर ब्रँड आहे. ही सर्वात जुनी आणि प्रसिद्ध कंपनी आहे. ‘8 PM व्हिस्की’, ‘मॅजिक मोमेंट्स वोडका’ आणि ‘रामपुर सिंगल माल्ट’ सह इतर ब्रँडची भारतातच नाही तर 100 हून अधिक देशात विक्री होते. या कंपनीचे मार्केट कॅप 41,904 कोटी रुपये आहे. गेल्या 3 वर्षांत कंपनीने 198% परतावा दिला आहे.
‘असोसिएटेड अल्कोहल्स अँड ब्रुअरीज लिमिटेड’ (AABL) हा चौथा ब्रँड आहे. मध्य प्रदेशमधील मद्य बाजारात या कंपनीचा वाटा 20-25 टक्के इतका आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2,309 कोटी इतके आहे. 3 वर्षांत कंपनीने 162 टक्के परतावा दिला.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ शेअरची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
