AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात रूम कूलरमुळे वाढली उकाड्याची समस्या? ‘हा’ डिव्हाईस देईल कायमचा आराम

पावसाळ्यातही उकाडा आणि चिपचिपाट ही एक सामान्य समस्या आहे, पण ती सुटण्याचे उपायही अगदी सोपे आहेत. डिह्युमिडिफायरचा वापर किंवा घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या खोलीचं वातावरण सुखद आणि कोरडं ठेवू शकता. त्यामुळे आता उकाड्याने त्रासून न जाता, हे स्मार्ट उपाय वापरा आणि पावसाचा आनंद घ्या!

पावसाळ्यात रूम कूलरमुळे वाढली उकाड्याची समस्या? 'हा' डिव्हाईस देईल कायमचा आराम
रूम कूलरची हवा झाली त्रासदायक? Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 2:22 PM
Share

भारतात भीषण तापमानानंतर आता पावसाने हजेरी लावली आहे. जरी थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी आता उकाडा आणि चिपचिपाटाने लोक त्रस्त झाले आहेत. विशेषतः बंद खोलीत चालणारा रूम कूलर उकाडा अजूनच वाढवतो. थंड हवा सुरुवातीला आरामदायक वाटते, पण काही वेळातच घरातली आर्द्रता वाढून वातावरण असह्य होतं. अशा परिस्थितीत तुम्हाला एक खास आणि आधुनिक गॅजेटचा वापर करून या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते.

पावसात उकाडा वाढण्यामागचं कारण

पावसाळ्यात हवेत आर्द्रतेचं प्रमाण लक्षणीय वाढतं. जेव्हा आपण अशा वातावरणात रूम कूलर वापरतो, तेव्हा तो खोलीत थंड हवेसोबत अधिक ओलावा पसरवतो. त्यामुळे हवामान थंड असलं तरी खोलीतील वातावरण दमट, चिपचिपीत आणि अस्वस्थ होतं. विशेषतः बंद खोलीत कूलर चालविल्यास हवेत साचलेला ओलावा उकाडा अधिक वाढवतो.

काय आहे डिह्युमिडिफायर?

डिह्युमिडिफायर हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे वातावरणातील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेतं. याच्या वापरामुळे खोलीतील उकाडा आणि चिपचिपटपणा कमी होतो. बाजारात डिह्युमिडिफायर वेगवेगळ्या प्रकारात आणि किमतीत उपलब्ध आहेत. किंमती ३,००० रुपयेपासून सुरू होऊन २५,००० रुपयांपर्यंत जातात.

कसा काम करतो डिह्युमिडिफायर?

डिह्युमिडिफायरमध्ये मुख्यतः तीन युनिट्स असतात : फॅन, कूलिंग कॉइल आणि वॉटर टँक. हे यंत्र सुरु केल्यावर फॅन खोलीतील हवा आत ओढतो. ही हवा कूलिंग कॉइलमधून जाताना थंड होते आणि तिच्यातील नमी पाण्यात रूपांतरित होते. हे पाणी वॉटर टँकमध्ये जमा होतं, जे वेळोवेळी रिकामं करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे डिह्युमिडिफायर खोलीतील दमटपणा कमी करून हवा कोरडी आणि थंड बनवतो.

घरगुती उपायसुद्धा आहेत फायदेशीर

ज्यांच्या घरात डिह्युमिडिफायर नाही, त्यांनी काही साधे घरगुती उपाय करूनदेखील कूलरमुळे होणारी उकाडा कमी करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कूलर नेहमी उघड्या खिडकीजवळ ठेवावा, यामुळे हवेतला साचलेला ओलावा बाहेर जाऊन वायुवीजन सुरळीत राहते. यासोबतच खोलीतील रोशनदारे किंवा व्हेंटिलेशन खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून ताज्या हवेचा प्रवेश होऊन खोलीतील घामटपणा दूर होतो.

तसेच, जर एखाद्या क्षणी जाणवू लागले की कूलरमुळे उकाडा अधिक वाढली आहे, तर त्याच वेळी कूलरमध्ये पाण्याचा पुरवठा थांबवावा. त्यामुळे कूलर कोरडी हवा फेकू लागतो आणि खोलीतील चिपचिपटपणा काही प्रमाणात कमी होतो. हे उपाय खर्चिक नसून सहज करता येणारे आहेत, आणि विशेषतः पावसाळ्यातील उकाडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.