
स्वयंपाकघरातील भाज्या ताज्या ठेवणे हे प्रत्येक गृहिणीसाठी एक मोठं टेंशन असतं. विशेषतः जेव्हा त्या वेळेआधी खराब होतात आणि टाकाव्या लागतात, तेव्हा मन दुखतं. आपल्याकडे कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची, बटाटे आणि टोमॅटो अशा भाज्या पटकन सडतात, सुकतात किंवा मऊसर होतात. पण आता यावर एकदम सोपे आणि घरगुती उपाय समोर आले आहेत ते सहज वापरता येतील आणि परिणामही चांगले मिळतील.
कोथिंबीर किंवा हरा धनिया फारच लवकर सुकतो, पण मालविकाने सांगितलेल्या पद्धतीने तो तब्बल 1 महिना ताजा राहू शकतो. सर्वप्रथम, कोथिंबीरीच्या खालच्या काड्या थोड्या कापून टाका. नंतर एक स्वच्छ ग्लास किंवा जार घ्या आणि त्यात थोडंसं पाणी भरा. आता कापलेल्या काड्या त्या पाण्यात बुडवा जणू तुम्ही फुलं ठेवताय तसं! हा जार फ्रिजमध्ये ठेवा आणि दर दोन दिवसांनी पाणी बदला. त्यामुळे बॅक्टेरिया वाढणार नाहीत आणि कोथिंबीरही फ्रेश राहील.
बटाटे साठवून ठेवले की थोड्याच दिवसांत त्याला कोंब फुटतात. ही समस्या दूर करण्यासाठी एक मजेदार ट्रिक आहे बटाट्यांच्या ढिगात 1-2 सफरचंद ठेवा. सफरचंद एथिलीन नावाची एक वायू सोडतो, जी बटाट्यांमधील अंकुर वाढण्याची प्रक्रिया मंद करते. हे लक्षात ठेवा की बटाटे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवा. फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका, कारण त्यामुळे त्याची चव बदलते.
लिंबं फार लवकर सुकतात आणि कठीण होतात. त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे एक एअरटाइट डब्बा घ्या, त्यात पाणी भरा आणि लिंबू पूर्णपणे पाण्यात बुडवून ठेवा. हा डब्बा फ्रिजमध्ये ठेवा आणि दररोज पाणी बदला. यामुळे लिंबू स्वच्छ पाण्यात राहतील, खराब होणार नाहीत आणि 1-2 महिने रसाळ राहतील.
बहुतेक लोक हिरवी मिरची दांड्यासकट ठेवतात, पण ती मोठी चूक असते. मालविकानुसार, हिरवी मिरची स्टोर करण्यापूर्वी तिच्या दांड्या काढून टाका. दांड्यांमधून नमी आणि बॅक्टेरिया मिरचीत जातात, त्यामुळे ती लवकर सडते. दांड्या काढून, एक एअरटाइट डब्बा घ्या, त्यात खालच्या बाजूला टिश्यू पेपर किंवा स्वच्छ किचन टॉवेल ठेवा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषून घेतला जाईल आणि मिरची कोरडी, ताजी राहील.
टोमॅटो लवकर खराब होतात, विशेषतः वरच्या भागातून. यावर उपाय म्हणजे प्रत्येक टोमॅटोच्या वरच्या टोकाला थोडं खाद्यतेल लावा. तेलाची ही पातळ लेयर त्याला सील करते आणि टोमॅटोमध्ये नमी किंवा हवा जाणं थांबतं. त्यामुळे ते बराच काळ ताजे राहतात. नंतर ते फ्रिजमध्ये ठेवावे.
तर अशा या स्मार्ट आणि सोप्या टिप्स वापरून आपल्या स्वयंपाकघराला बनवा अन्नधान्याचं ताजं ठिकाण.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)