प्रेशर कुकरची शिट्टी वाजवताच पाणी पसरतं? शेफ रणवीर ब्रारचे ‘हे’ 7 कुकिंग हॅक नक्की वापरून पाहा

Kitchen Tips: शेफ रणवीर ब्रारचे 'हे' 7 कुकिंग हॅक नक्की वापरून पाहा, किचनमध्ये नाही येणार कोणतीच अडचण... प्रेशर कुकरची शिट्टी वाजवताच पाणी पसरत असेल तर काय कराल?

प्रेशर कुकरची शिट्टी वाजवताच पाणी पसरतं? शेफ रणवीर ब्रारचे हे 7 कुकिंग हॅक नक्की वापरून पाहा
| Updated on: Feb 16, 2025 | 3:02 PM

Kitchen Tips: आजच्या धकाधकीच्या किचनमध्ये काम करताना अनेक अडचणी येतात. किचनमध्ये वेग-वेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जातात. कधीकधी काही लोकांना भाज्या आणि मसाले चिरून आणि बारीक करायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या कुकिंग हॅक्स आणि किचन टिप्स वापरून पहा. तुम्हाला किचनमधील अनेक टिप्स आणि हॅक मिळतील. शेफ रणवीर ब्रार त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा विविध पाककृती तसेच किचन टिप्स आणि हॅक शेअर करतो. आज अशा काही टीप्स जाणून घेऊ ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील…

शेफ रणवीर ब्रार याचे 7 किचम टीप्स…

जेव्हा तुम्ही प्रेशर कुकरमध्ये काही शिजवता तेव्हा तांदूळ आणि डाळीचे पाणी बाहेर फेकायला लागतं? डाळ आणि तांदळाच्या पाण्यात थोडं तूप घालून शिट्ट्याभोवती तूप लावा. ज्यामुळे प्रेशर कुकर ओव्हरफ्लो होण्यापासून रोखेल.

सुरण खायला आवडत असेल तर चांगलं, पण कधी कधी सुरण सोलताना आणि कापताना हाताला खाज सुटते आणि तळहातालाही चिकटते. अशा स्थितीत तळहातावर मोहरीचे तेल नीट लावा. तसेच सुरण उकळताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकावे. यामुळे एन्झाईम्स खराब होतात, ज्यामुळे घशात खाज येते.

नवीन तवा वापरत असाल तर आधी स्वच्छ करून घ्या. नंतर तवा कोरडा करून थोडे तेल घालून कांद्याच्या तुकड्याने चोळा. यामुळे पॅन गुळगुळीत आणि नॉन-स्टिक दिसेल.

जर तुम्ही खीर बनवत असाल तर बासमती तांदूळ वापरू नका, कारण ते नाजूक आणि ठिसूळ असतात. लहान दाण्यांच्या तांदळाची खीर बनवणं कधीही चांगलं. या प्रकारच्या भातापासून बनवलेली खीरही चवीला छान लागते.

जर तुम्हाला अंडी जास्त काळ ताजी ठेवायची असतील तर ती ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. अंड्याची टोकदार बाजू तळाशी आणि गोलाकार भाग वरच्या बाजूला ठेवा.

जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या पाण्यात उकळा तेव्हा त्यात मीठ आणि बेकिंग सोडा घाला. त्यामुळे भाज्यांचा प्रत्येक रंग बदलत नाही.

कांदा, मसाले, टोमॅटो आणि व्हिनेगर घालून मसाल्याची पेस्ट तयार करू शकता आणि ते तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. ही पेस्ट तुम्ही कधीही वापरू शकता. कांदा, टोमॅटो, मसाले, व्हिनेगर एकत्र मिक्स करून शिजवा. हे तुम्ही कोणत्याही उत्तर भारतीय पदार्थात वापरू शकता.