माउंटन आणि हिलमध्ये नक्की काय फरक असतो? वाचा संपूर्ण माहिती
आपण सुट्टीत फिरायला डोंगराळ भागांमध्ये जातो तेव्हा अनेकदा ‘माउंटन’ आणि ‘हिल’ या संज्ञा सर्रास एकाच अर्थाने वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की या दोघांमध्ये भूगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून मोठा फरक आहे? चला तर मग, या लेखात आपण माउंटन आणि हिल यामधील नेमका फरक सोप्या भाषेत जाणून घेऊया.

सुट्टीच्या दिवसात डोंगराळ भागांत फिरायला जाणं हे अनेकांच्या आवडीचं असतं. शिमला, मनाली, उत्तराखंड अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण अनेकदा भेट देतो. मात्र आपण ज्या ठिकाणी जातो, ती ठिकाणं खरंच ‘माउंटन’ असतात की फक्त ‘हिल’? हे बहुतेक लोकांना माहिती नसतं. भूगोलशास्त्राच्या दृष्टीने यामध्ये स्पष्ट आणि महत्त्वाचा फरक असतो. आज आपण या लेखामध्ये माउंटन आणि हिल यामधील अचूक भौगोलिक आणि नैसर्गिक फरक जाणून घेणार आहोत.
माउंटन आणि हिलमध्ये उंचीचा फरक काय?
माउंटन म्हणजे असा भूभाग जो समुद्रसपाटीपासून सुमारे 1,000 ते 2,000 फूट (300 ते 600 मीटर) किंवा त्यापेक्षा जास्त उंच असतो. काही व्याख्यांनुसार ही उंची 2,000 फूट पेक्षाही अधिक असू शकते. माउंटनच्या टोकांवर बर्फ साचलेली असतो आणि त्यांची चढण अत्यंत कठीण व तीव्र असते. याच्या उलट, हिल ही समुद्रसपाटीपासून 1,000 फूट (300 मीटर) पेक्षा कमी उंचीची रचना असते. हिल तुलनेने सौम्य उताराची, कमी खडबडीत, व चढण्यास सोपी असते. याच्या शिखरांवर बर्फ फारसा आढळत नाही.
बनावट आणि उतारात काय फरक असतो?
माउंटन हे अधिक खडबडीत आणि कठीन उताराचे असतात. त्यामध्ये खोल दऱ्या, खतरनाक वळणांचे रस्ते असतात. या रचना प्रामुख्याने भूगर्भातील हालचालीमुळे तयार झालेल्या असतात. हिल हे तुलनेने गोलसर, सौम्य उताराचे असतात. त्यामध्ये फारसा खडकाळपणा नसतो आणि रचनाही सरळ असते.
हवामान आणि वनस्पतींचा फरक
माउंटनवर उंची जास्त असल्यामुळे थंडीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे येथे फक्त थंडी झेलू शकणाऱ्या वनस्पती उगम पावतात जसे की देवदार, चीड़ यांचे घनदाट अरण्य. हिलवर मात्र हवामान माफक थंड आणि आल्हाददायक असतं. येथे झुडपं, गवत, आणि विविध प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामध्ये पाऊस आणि सूर्यप्रकाश दोन्हींचं प्रमाण समतोल असतं.
शेवटी काय
माउंट हे उंच, आव्हानात्मक आणि थंड हवामान असलेले असतात, तर हिल या सौम्य उताराच्या, सहज चढण्यासारख्या आणि अधिक हिरवळयुक्त असतात. जर तुम्ही ट्रेकिंग किंवा निसर्ग सफरीसाठी बाहेर पडत असाल, तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या भूभागावर जात आहात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
