AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Girlfriend Day 2023 : ‘तिला’ खूश करण्यासाठी एक सूवर्णसंधी, गर्लफ्रेंडला ‘असं’ इम्प्रेस करा

आपली कुणीतरी एक गर्लफ्रेंड असावी, असं वाटणं यात काही वावगं असं काहीच नाही. ही तर नैसर्गिक भावना आहे. महत्त्वाचं हे आहे की आपल्याला एखादी गर्लफ्रेंड मिळाल्यानंतर आपण तिच्यासोबत कसं वागतो, कसं राहतो, आपलं नातं जपण्याचा कसा प्रयत्न करतो हे जास्त महत्त्वाचं आहे.

National Girlfriend Day 2023 :  'तिला' खूश करण्यासाठी एक सूवर्णसंधी, गर्लफ्रेंडला 'असं' इम्प्रेस करा
लग्नाचे आमिष दाखवत प्रेयसीला लाखोंचा गंडाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2023 | 11:56 PM
Share

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ दिवंगत कवी मंगेश पाडगांवकर यांची “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं आमचं सगळ्याचं सेम असतं” ही कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रेम ही भावनाच वेगळी असते. प्रेमात समर्पण असतं. प्रेमात जिव्हाळा असतो. प्रेमात एक सुख असतं. त्यामुळे प्रेमाच्या कितीही कविता, गाणी ऐकल्या तरी आपल्याला कमी पडतील. कारण प्रेम ही भावनाच तशी असते. आपली कुणीतरी एक गर्लफ्रेंड असावी, असं वाटणं यात काही वावगं असं काहीच नाही. ही तर नैसर्गिक भावना आहे. महत्त्वाचं हे आहे की आपल्याला एखादी गर्लफ्रेंड मिळाल्यानंतर आपण तिच्यासोबत कसं वागतो, कसं राहतो, आपलं नातं जपण्याचा कसा प्रयत्न करतो हे जास्त महत्त्वाचं आहे.

अनेक जण नातं जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते आयुष्यभर एकमेकांचे जोडीदार बनून राहतात. पण काही नाती फार काळ टिकत नाहीत. काही मुलं आपल्या गर्लफ्रेंडच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यात कमी पडतात. त्यांना वाटतं की ते महागडे गिफ्ट देऊ शकत नाहीत किंवा पैशांअभावी आपण काही सरप्राईज आपल्या गर्लफ्रेंडला देऊ शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा नात्याच अडचणी येतात. पण अशा तरुणांनी नाराज होण्याचं कारण नाही. तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची मनधरणी करण्यासाठी एक संधी चालून आली आहे. कारण आज नॅशनल गर्लफ्रेंड डे आहे. या दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला काहीतरी सरप्राईज देवून खूश करु शकता.

गर्लफ्रेंडला कशापद्धतीने खूश करता येईल?

1) लव्ह लेटर लिहा

मुली फार भावनिक असतात. त्या रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्या प्रचंड भावनिकरित्या गुंतलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या या प्रेमाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यांचा विचारांचा आणि भावनांचा आदर केला पाहिजे. कारण आपल्यावर तितकं प्रेम इतर कुणीही करु शकत नाही. त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी आज चांगला योग जुळून आला आहे. कारण आज नॅशनल गर्लफ्रेंड दिवस आहे.

आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी एक लव्ह लेटर लिहा. मग ते मोबाईल, ई-मेल, टेक्स मेसेज कशाच्याही माध्यमातून लिहा. याशिवाय इमोजी पाठवून आपल्या गर्लफ्रेंडसमोर आपल्या भावना व्यक्त करा. आपली गर्लफ्रेंड आपल्यासाठी इतकी स्पेशल का आहे, ते तिला पटवून द्या. तसेच तिच्या शिवाय घालवलेला क्षण आपल्यासाठी किती कठीण असतो ते या लव्ह लेटरच्या माध्यमातून लिहा. या लव्ह लेटरमुळे तुमची गर्लफ्रेंड निश्चित प्रचंड खूश होईल.

2) आवडणाऱ्या गोष्टी करा

दुसरा आणखी एक महत्त्वाचा सल्ला. गर्लफ्रेंड दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रेयसीला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करु शकता. आपल्या गर्लफ्रेंडला आवडणारी एखादी टूर बुक करा. तिला लाँग ड्राईव्हला घेऊन जा. तिला डान्स, कुकिंग, म्युजिक किंवा वर्कआउटची आवड असेल तर तसा काही प्लॅन करा. तिची जी इच्छा पूर्ण करता येईल ती इच्छा पूर्ण करा. तिला खूप आनंद होईल आणि तुमचं नातं आणखी घट्ट होईल.

3) तिच्यासाठी वेळ काढा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना वेळ देणं. आपण कामामध्ये इतके गुंतलेलो असतो की आपल्या प्रेयसीसोबत बोलण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. यामुळे देखील नात्यावर वाईट परिणाम पडू शकतात. त्यामुळे वेळ द्या. आपल्या पार्टनरला वेळ दिला तर त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतील. गर्लफ्रेंडला वेळ दिल्याने रिलेशन घट्ट होतं आणि नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं. नैराश्य आपल्या आयुष्याला सपर्श करत नाही.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.