लग्नाचा नवा ट्रेंड…लग्नाळूसाठी इव्हेंटचा बाजार, मेकअपपासून ते मेहंदीपर्यंत बदलत्या लग्नाची कहाणी
New Wedding Trend : पूर्वी वधू-वराच्या हातावरील मेहंदी खुलली तर त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, असे म्हणायचे. आता तर लग्न एक इव्हेंट झाला आहे. इतकेच नाही तर या काळात एक लव्ह स्टोरी खुलत असल्याचे दिसते. प्री-वेडिंग फोटो शूटपासून ते लग्नापर्यंत अनेक कार्यक्रमाची रेलचेल आहे. अशी बदलत गेली लग्नाची प्रेम कहाणी...

सुंदरतेच्या व्याख्यात भारतात वधू ही प्रत्येकवेळी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपण काही चांगले दिसले की लागलीच म्हणतो नवरीसारखी नटली आहे. नववधूलाच चंद्राची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वधूला नटवण्यासाठी लग्नात मोठा तामझाम असतो. तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट अगोदरपासूनच तयारी सुरू होते. पूर्वी केवळ पार्लरला जाऊन आले की झाले असे होत होते. पण आता मेकअप ही हायक्लास झाला आहे. मेकअप आर्टिस्ट आता स्वत: नवरीला सजवत आहेत. आता लग्नाचा ट्रेंड बदलत आहे. त्याप्रमाणे मेकअप सुद्धा बदलत आहे. बॉलिवूड, हॉलिवूड पद्धतीने मेकअपचा नवीन ट्रेंड येत आहे. या लग्न कथेत मेकअपच नाही तर लग्नाची प्रेम कहाणी अशी बदलत गेली. ...
