रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर बर्फ चोळण्याचे फायदे जाणून आश्चर्य वाटेल
चेहऱ्यावर बर्फ लावणे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ही एक उत्तम ब्यूटी सिक्रेट आहे. आयसिंग केल्याने रक्ताभिसरण वाढते, छिद्रे आकुंचन पावतात आणि त्वचा चमकदार होते. पण रात्री झोपण्यापूर्वी जर आयसिंग केलं त्याचे अधिक चांगले परिणाम मिळतात.

बर्फ हा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्याच्या वापराने त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. दिवसातून एकदा जरी बर्फाचा छोटा तुकडा चेहऱ्यावर फिरवल्याने रक्ताभिसरण वाढते, छिद्रे आकुंचन पावतात, जळजळ आणि लालसरपणा कमी होतो आणि त्वचा मऊ आणि तरुण राहते. सेलिब्रिटी देखील अनेकदा बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याबद्दल किंवा त्याच्या वापराबद्दल सांगताना तसेच स्वत: ते वापरताना देखील दिसतात.
बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मालिश केल्याचे फायदे
शिवाय, बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मालिश केल्याने इतरही अनेक फायदे होतात. तथापि, बरेच लोक निरोगी आणि तरुण त्वचा राखण्यासाठी बर्फाचे तुकडे एकापेक्षा जास्त वेळा वापरतात. पण बर्फाचे तुकडे एकापेक्षा जास्त वेळा वापरणे खरोखर त्वचेसाठी फायदेशीर आहे का? आणि त्याचा योग्य वापर नक्की कसा करायचा चला जाणून घेऊयात.
दिवसातून किती आयसिंग करावे?
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच बर्फाचा वापर करणे चांगले. बर्फाचे तुकडे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकतात, परंतु बर्फाच्या जास्त वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. यासाठी काय करावे? पाहुयात.
चेहऱ्यावर आयसिंग कोणी टाळावं?
बहुतेक लोकांसाठी फेशियल आयसिंग सुरक्षित आहे. परंतु तज्ज्ञ म्हणतात की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये ते टाळावे, जसे की…
जास्त कोरडी किंवा संवेदनशील त्वचा : जास्त कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असेल आणि तुम्ही चेहऱ्यावर बर्फ जास्त वेळा लावल्याने जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो, विशेषतः ज्यांची त्वचा आधीच संवेदनशील आहे अशा लोकांमध्ये. त्यासाठी बर्फ कमी लावा आणि तो थेट लावणे टाळा तो सुती कपड्यात घेऊन त्वचेवर न रगडता हळू हळू फक्त डॅब करा. म्हणजे शेक दिल्यासारख करा. तरीही फायदे मिळतील.
चेहऱ्यावरील उपचार: जर तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी, लेझर, पीलिंग किंवा इतर कोणतीही ट्रिटमेंट केली असेल तर चेहऱ्यावरील आयसिंग टाळा, तुमची त्वचा नैसर्गिकरित्या बरी होऊ द्या. किंवा थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फेस आयसिंग क्यूब
आइस क्यूब्स बनवण्यासाठी कोरफडीचा वापर देखील करू शकता. कोरफड जेलला बर्फाच्या ट्रेमध्ये जमा करून तोही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. कोरफडीचा तुकडा पाण्यात किंवा इतर घटकांसह मिसळून बर्फाच्या तुकड्यातील ट्रेमध्ये गोठवता येतो. हे तुकडे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला आराम मिळतो, जळजळ कमी होते आणि तसेच त्वचेची पोत सुधारतो. स्क्रबिंगनंतर हे तुकडे वापरल्याने त्वचेला आराम मिळतो. फक्त तो रगडू नका.
आयसिंग करण्याची उत्तम वेळ
आयसिंग तुम्ही मेकअपआधी करू शकता. पण झोपण्यापूर्वी आयसिंग करणे अत्यंत फायदेशीर असते. यामुळे तुमच्या त्वचेला काही तास आराम मिळतो. जर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर जळजळ होत असेल तर बर्फाचे तुकडे फायदेशीर ठरतील. दिवसातून एकदाच आयसिंग करा. जास्त वापर करणे टाळा.
