महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स हे नाकावर व नाकाच्या वरच्या भागावर आणि हनुवटीवर सामान्यपणे असतात. या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन घटकांची आवश्यकता आहे. चला तर मग कोणते तीन घटक आहेत जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या दूर करतील. ते जाणून घेऊयात.

महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त हे 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 7:19 PM

तेलकट त्वचा असलेल्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्‍या समस्या सारख्या सतावत असतात. नाकाच्या आसपासचा भाग आणि हनुवटीची त्वचा या भागांवर‍ ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहड्स होत असतात. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्समुळे तुमचा चेहरा काळवंडलेला दिसतो. जेव्हा घाम, तेल, मृत त्वचा, धूळ आणि ममेकअपचे कण त्वचेची छिद्रे बंद करतात, तेव्हा या समस्या निर्माण होतात. त्यामुळे व्हाइटहेड्स वाढल्यास त्वचेव मुरुम येऊ शकतात, तर ब्लॅकहेड्स असलेल्या भागामुळे त्वचा अधिक काळसर दिसू शकते.तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक उपाय करू शकतात. त्वचेच्या या समस्या कमी करण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत. योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता होईल आणि ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्स या दोन्हींपासून सुटका होऊ शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण घरगुती कोणते नैसर्गिक उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स का येतात?

जेव्हा त्वचा व्यवस्थित स्वच्छ होत नाही तेव्हा ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स प्रामुख्याने होतात. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये सेबम (तेल) जमा होते. यातूनच आधी व्हाईटहेड्स आणि नंतर ब्लॅकहेड्स तयार होतात.

व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स पासून सुटका मिळवण्यासाठी या तीन घरगुती घटकांचा करा वापर

तुम्हाला जर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास होत असेल, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला तीन घटकांची आवश्यकता असेल: तांदळाचे पीठ, मसूर डाळीचे पीठ आणि दही. या तिन्ही घटक खूप प्रभावीपणे त्वचेवर काम करतात.

अशा पद्धतीने करा उपायाचा अवलंब

एका भांड्यात आवश्यक तेवढे तांदळाचे पीठ, तेवढीच मसूर डाळीची पावडर हे एकजीव करून पेस्ट तयार होईल इतके दही एकत्र करा. हा तुमचा नैसर्गिक सौम्य स्क्रब बनेल.

तुमची त्वचा कशी स्वच्छ करावी

हा स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हळुवारपणे मसाज करा. ज्या भागांवर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होण्याची शक्यता असते, त्या भागांवर विशेष लक्ष द्या. यामुळे मृत त्वचा स्वच्छ होईल आणि त्वचेच्या छिद्रांमधील घाण काढून टाकण्यास मदत होईल. तुम्ही हा स्क्रब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.

या तीन गोष्टी कशा फायदेशीर आहेत?

तांदूळ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि त्वचेला उजळ बनवण्यासोबतच मृत पेशी काढण्याचा हा एक सर्वात सौम्य मार्ग आहे. तर या स्क्रबमधील मसूर डाळीची पावडर त्वचेसाठी आश्चर्यकारक फायदे आहेत आणि ती देखील मृत पेशी काढून टाकण्यास प्रभावी आहे. दुसरीकडे दही केवळ त्वचा स्वच्छच करत नाही तर तिला आर्द्रता देखील प्रदान करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us