AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार… पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी

War Winner Prediction : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे, मात्र दोन आठवड्यांनंतर ते पुन्हा सुरू होऊ शकते. अशातच आता या युद्धाबाबत खतरनाक भविष्यावाणी करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प थेट टोकाचा निर्णय घेणार... पण इराणविरुद्धचे युद्ध जिंकणार की हरणार? जगाची झोप उडवणारी भविष्यवाणी
US Iran War WinnerImage Credit source: Google
| Updated on: Apr 09, 2026 | 9:26 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध दोन आठवड्यासाठी थांबले आहे. मात्र या युद्धाचा अंतिम निकाल लागलेला नाही. अशातच आता या युद्धाबाबत खतरनाक भविष्यावाणी करण्यात आली आहे. चीनमध्ये एक प्राध्यापक आहेत, जे स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालवतात आणि अलीकडच्या काळात त्यांच्या अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्या आहेत. जियांग ज्यूकिन नावाच्या या व्यक्तीने केलेल्या एका भविष्यवाणीमुळे पुन्हा एकदा जगाची झोप उडाली आहे. ही भविष्यवाणी नेमकी काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘प्रिडिक्टिव हिस्ट्री’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या जियांग यांनी आधीच सांगितले होते की इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेला अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांनी हेही म्हटले होते की, ट्रम्प बड्या धमक्या देतील, पण शेवटी ते मागे हटतील. त्यांचे हे भाकीत काही दिवसांपूर्वी खरे ठरले, कारण ट्रम्प यांनी अनेकदा डेडलाइन दिली आणि इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती. मात्र डेडलाइन पूर्ण होण्याच्या अगदी आधी ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाची माहिती दिली होती.

युद्धाबाबत नवी भविष्यवाणी

जियांग यांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाबाबत एक धोकादायक भाकीत केले आहे. त्यांच्या मते, अमेरिका इराणमध्ये आपली भूदल सेना नक्की पाठवेल आणि त्यामुळे युद्ध अधिक भीषण होईल. फक्त हवाई हल्ले पुरेसे ठरणार नाहीत. मात्र इराण अत्यंत सावधगिरीने परिस्थिती हाताळत आहे. त्याच्याकडे अमेरिकेसारखी प्रबळ सैन्य शक्ती नसली तरी तो अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकत आहे. तसेच अमेरिका एका ठरलेल्या योजनेनुसार पुढे जात आहे. ज्याच्याकडे अधिक पर्याय आणि लवचिक रणनीती असेल, तोच या युद्धात जिंकेल. केवळ मजबूत शस्त्रास्त्रे आणि सैन्य शक्ती असणे पुरेसे नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिका युद्ध हरणार की जिंकणार?

दोन वर्षांपूर्वीही जियांग तीन भाकीत केली होती. ट्रम्प यांची पुनरागमन होईल, त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध होईल, आणि तिसरे म्हणजे या युद्धात अमेरिकेचा पराभव होईल. जियांग यांची पहिली आणि दुसरी भविष्यवाणी खरी ठरली आहे. तिसऱ्या भविष्यवाणीबाबत बोलल्यास जरी युद्धविराम झाला असला तरी अजून कोणताही अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे ही भविष्यवाणीही खरी ठरू शकते.

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....