AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय

आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर त्याचा मोठा परिणाम हा आपल्यावर होत असतो. ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते अशा घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 8:51 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते, जसं की काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं होतात. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यवसायामध्ये तोटा होतो. घरात आजारपण वाढतं. एवढंच नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, याचं आणखी एक मुख्य लक्षण म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफीसमधून घरी येतात तेव्हा तुम्हाला घरात अस्वस्थ वाटतं. तुमच्या मनाची सारखी चीडचीड होते. घरात थांबावं वाटत नाही. हे सर्व घरातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे होऊ शकतं. घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी कसा करायचा? आणि ऊर्जा संतुलन कसं साधायचं? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

करा हा सोप उपाय

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत आहे, तर अशावेळी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय दररोज सात दिवस करायचा आहे. तुमच्या तळहातावर थोडं मीठ आणि हळद घ्या, दोन्ही तळ हात एकमेकांना दोन ते तीन मीनिटं घासा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात पाण्याने स्वच्छ धोवून टाका. हा प्रयोग सात दिवस केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तसेच जर तुमच्या घरात तुळस नसेल तुळस आवश्य लावावी, घराच्या ईशान्य दिशेला तुळस असेल तर घरामध्ये कधीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. घरात सदैव सकारात्मक वातावरण राहतं. तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असेल त्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि त्या घरात कधीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने पैशांची कमी भासत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,