
पालक होणे हे एक जबाबदारीचे आणि आव्हानात्मक काम आहे. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांसाठी फक्त सर्वोत्तम गोष्टी कशा देता येतील हे पाहत असतात. जसे की त्यांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी खुप प्रयत्न करत असतात. परंतु कधीकधी पालक असे निर्णय घेतात किंवा अशा प्रकारे वागतात की मुलांच्या मानसिक, भावनिक किंवा सामाजिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बऱ्याचदा काही पालक अशा चुका करतात ज्यांचा मुलांच्या आत्मविश्वासावर खोलवर परिणाम होतो.
या लेखात आपण पालक जाणून बुजून किंवा अजाणतेपणे करत असलेल्या काही सामान्य पण गंभीर चुकांबद्दल जाणून घेणार आहोत. याशिवाय, आपण हे कसे टाळायचे ते देखील जाणून घेऊयात, जेणेकरून ते मुलांचे नुकसान होणार नाहीत आणि त्यांचे भविष्य निरोगी आणि आनंदी असेल.
1. मुलांची तुलना करणे
बऱ्याचदा काही पालक त्यांच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात. जसे की “बघा यांचा मुलगा किती चांगला आहे”, “तुम्हाला काहीच माहित नाही”. ही वाक्ये प्रत्येक घरात कधी ना कधी ऐकायला मिळतात. पण हे मुलांसाठी खूप हानिकारक आहे. यामुळे मुलामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. मत्सराची भावना निर्माण होते आणि मूल स्वतःला कनिष्ठ समजू लागते. म्हणून, तुमच्या मुलाची तुलना कधीही दुसऱ्या मुलाशी करू नका.
2. मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे
काही पालक आपल्या मुलांवर सर्वकाही लादतात आणि त्यांच्या शब्दांकडे आणि भावनांकडे दुर्लक्ष करतात. जणू मुलांच्या काही गोष्टी असतात जे तो मोठ झाल्यावर समजेल, तसेच ‘शांत राहा, ही रडण्यासारखी गोष्ट आहे का?’ असे सांगून त्यांच्या काही गोष्टी टाळणे. असे केल्याने मुल आतल्याआत त्यांच्या भावना दाबून टाकतात. भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते. म्हणून, मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.
3. नेहमी ‘नाही’ म्हणणे किंवा खूप बंधने घालणे
जेव्हा जेव्हा मूल काही विचारते किंवा काही बोलते तेव्हा त्याचे ऐकून न घेणे किंवा प्रत्येक बाबतीत त्याला थांबवणे. यामुळे मुलाला कोणतीही गोष्ट करण्यास भीती वाटते. आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि आपले विचार व्यक्त करण्यासही भीती वाटते. म्हणून गरजेनुसार सीमा निश्चित करा पण त्यांना स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी देखील द्या.
4. मुलांच्या उपस्थितीत वाद घालणे किंवा मारामारी करणे
काही पालक मुलांसमोरअनेकदा एकमेकांशी मोठ्याने बोलत असतील किंवा घरी भांडत असतील. याचा त्यांच्या वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलाला असुरक्षित वाटते. मानसिक ताण आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. मुलाच्या वागण्यात चिडचिड देखील येऊ शकते. म्हणून, घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वाद झाला तरी मुलासमोर ते करू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)