
तिहेरी तलाकमुळे अनेक मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सांगायचं झालं तर, भारतात तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे. पूर्वी पुरुष तलाक… तलाक… तलाक… म्हणत पत्नीला घटस्फोट द्याये… पण यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली… पण तुम्हाला माहिती आहे, मुस्लिम धर्मात फक्त तिहेरी तलाक नाही तर, अन्य चार मार्गांनी देखील घटस्फोट देता येतो… तर मुस्लिम धर्मात इतर कोणत्या मार्गांनी घटस्फोटा घेता येतो, त्याबद्दल जाणून घेऊ…
तिहेरी तलाक : तिहेरी तलाक हे इस्लाम धर्मात घटस्फोट देण्याचा एक मार्ग आहे… याला इसे तलाक-ए-बिद्दत, तत्काल तलाक, या तालक-ए-मुघलाजाह असं देखील म्हणतात… तीन तलाकमध्ये पुरुष त्याच्या पत्नीला तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द बोलतो. त्यानंतर इस्लाम धर्मानुसार पती – पत्नीचा घटस्फोट होतो… परंतु 19 सप्टेंबर 2018 रोजी लागू झालेल्या कायद्यानुसार तिहेरी तलाक देणं हा गुन्हा आहे. भारतात तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे.
इस्लाममध्ये, पती-पत्नी दोघांनाही घटस्फोट घेण्याच्या अधिकारासह अनेक अधिकार आहेत. इस्लाममध्ये चार प्रकारचे घटस्फोट सांगितले आहेत. तलाक-ए-हसन, तलाक-ए-किनाया, तलाक-ए-बाइन आणि तलाक-ए-बिद्दत म्हणजे यामध्ये तीन तलाक देखील सामिल आहे.
तलाक-ए-हसन : तलाक-ए-हसनच्या अंतर्गत पती पत्नला तीन महिन्यात घटस्फोट देऊ शकतो. यमध्ये पुरुष पत्नीला एक महिन्याच्या अंतराने तलाक म्हणतो. पण यामध्ये काही अटी आहेत, पहिली अट म्हणजे पत्नीचा मासिक पाळी सुरु नसायला हवी.. दुसऱ्यांदा तलाक बोलण्याआधी दोघांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला जातो… पण तिसऱ्या महिन्यापर्यंत सर्वकाही सुरळीत झालं नाही तर, पती पत्नीला तिसऱ्या महिन्यांत तिसऱ्यांदा घटस्फोट म्हणतो. पण या तीन महिन्यांच्या काळात त्यांच्यामध्ये एकदा शरीरिक संबंध नाही झाले पाहिजे, असं झाल्यास घटस्फोटाला मान्यता मिळत नाही.
तलाक-ए-किनाया : तलाक-ए-किनाया मध्ये एका वेळेत घटस्फोट दिला जातो. तो तोंडी, लेखी किंवा व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे दिला जाऊ शकतो. यामध्ये, पती आपल्या पत्नीला काझींच्या उपस्थितीत, सार्वजनिकरित्या किंवा लिहून, मेसेज करून सांगतो की मी तुझ्यापासून विभक्त होत आहे.
तलाक-ए-बाइन : तलाक-ए-बाइम हे लिखित स्वरूपात, तोंडी किंवा सार्वजनिकरित्या देखील उच्चारलं जाऊ शकतं. या दरम्यान, पुरूष स्त्रीला सांगू शकतो की तो तिच्यापासून वेगळे होऊ इच्छित आहे. ‘मी तुला मुक्त करतो…’, ‘तू आणि हे नाते निषिद्ध आहे…’, ‘तू आता माझ्यापासून वेगळी झाली आहेस…’ असं म्हणत पती पत्नीला घटस्फोट देऊ शकतो.