केस गळती रोखण्यासाठी कांदा आणि लसणाचा रस फायदेशीर, वाचा याबद्ल अधिक!

| Updated on: Jun 03, 2021 | 7:24 AM

केस गळतीच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

केस गळती रोखण्यासाठी कांदा आणि लसणाचा रस फायदेशीर, वाचा याबद्ल अधिक!
केस गळती
Follow us on

मुंबई : केस गळतीच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण जर तरूण वयातच केस गळती होत असेल तर याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती टिप्स सांगणार आहोत. (Onion and garlic juice are beneficial for preventing hair loss)

केस गळती रोखण्यासाठी खास तेल घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा आणि लसून बारीक किसून अथवा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्या आणि लसणाचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्या, लसूण रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा. रोज हा रस केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील. कांद्याचा रस केसांना वेळेआधी पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करतो.

त्यामध्ये उपस्थित असलेल्या कॅटालिस नावाचे एंजाइम पांढऱ्या केसांना काळे करते आणि अकाली पांढरे होणाऱ्या प्रक्रियेस ब्रेक लावते. याशिवाय कांद्याचा रस केसांतील कोंडाची समस्याही संपवते. एका वाडग्यात कांद्याचा रस काढून टाळूवर मालिश करा आणि अर्धा तास ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. कांद्याचा वास दूर करण्यासाठी सौम्य शॅम्पूने केस धुवा.चेहर्‍यावर डागांची समस्या असल्यास कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. याशिवाय चेहर्‍यावरील डार्कनेसही घालवतो.

यासाठी एक चतुर्थांश चमचा कांद्याचा रस आणि तितक्याच प्रमाणात लिंबाचा रस मिसळा. यानंतर, 15 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. जर कांद्याचा रस लसणाच्या रसात मिसळला तर मुरुमांच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. कांद्यामध्ये जीवनसत्त्वे आणि लसूणमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. कांदा आणि लसूण दोन्ही रस समान प्रमाणात मिसळा आणि सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर तोंड धुवा.

(टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Onion and garlic juice are beneficial for preventing hair loss)