Health Tips : उन्हाळ्यात काढा पिणं किती उपयुक्त?, कधी आणि केव्हा प्यावा काढा; वाचा सविस्तर!

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवळपास सर्वजण काढा पिण्यावर भर देत आहेत.

Health Tips : उन्हाळ्यात काढा पिणं किती उपयुक्त?, कधी आणि केव्हा प्यावा काढा; वाचा सविस्तर!
खास पेय

मुंबई : कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवळपास सर्वजण काढा पिण्यावर भर देत आहेत. विशेष म्हणज काढ्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला जाण्यास मदत देखील होते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मात्र, हा काढा उन्हाळ्याच्या हंगामात पिणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न पडतो. कारण काढ्यामध्ये वापरले जाणारे घटक हे गरम स्वरूपाचे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात काढा पिणे सुरक्षित आहे किंवा नाही. (It is beneficial to drink extract in summer to boost the immune system)

काढा तयार करण्यासाठी लवंग, तुळस, दालचिनी, आले, काळी मिरी, हिंग, पुदिन्याचा पाने, सुंठ अशी बरीच मसाले वापरली जातात. यामुळे हंगामी संक्रमण आणि फ्लूशी लढायला मदत होते. याशिवाय संधिवात, डोकेदुखी, दमा, जंतुसंसर्गसारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

कोरोना काळात काढा कसा फायदेशीर?

तज्ञांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा सर्वात प्रभावी आहे. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध लढायला काढा मदत करतो. यामध्ये औषधी वनस्पती आणि मसाले असतात. जे अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतात. बर्‍याच तज्ञांच्या मते सध्याच्या या कोरोना काळात कोरोनापासून दूर राहण्यासाठी काढा अत्यंत फायदेशीर आहे. परंतु जर काढ्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

उन्हाळ्यात काढा पिणे सुरक्षित आहे का?

काढ्यामध्ये वापरले जाणारे घटक गरम असतात. यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, उन्हाळ्याच्या हंगामात काढा पिणे सुरक्षित आहे कि नाही. मात्र, उन्हाळ्यात देखील काढा पिणे आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहे. काढा हे एक निरोगी पेय आहे. काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

या प्रमाणे काढाचे सेवन करा

– दुपारी 4-5 च्या सुमारास काढा पिणे फायदेशीर आहे.

-काढा शक्यतो रिकाम्या पोटी पिऊ नये, यामुळे पित्त होऊ शकते. तसेच जेवल्यानंतरही लगेचच काढा पिणे टाळा.

-एका वेळी 150 मिली पेक्षा जास्त काढा पिऊ नका.

-शक्यतो काढ्यामध्ये मध टाका. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवणार नाही.

-काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत.

-काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

-लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.

(टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(It is beneficial to drink extract in summer to boost the immune system)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI