
जेव्हा आरोग्य आणि निरोगीपणाचा प्रश्न येतो, तेव्हा सोशल मीडियावर अनेक व्हायरल ट्रेंड्स पसरतात. यापैकी काही उपयुक्त असतात, काही संशयास्पद, तर काही पूर्णपणे विचित्र. असाच एक भुवया उंचावणारा ट्रेंड नुकताच इन्स्टाग्रामवर समोर आला. यावर डोळ्यांच्या एका डॉक्टराने प्रतिक्रिया दिली आहे. असे करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या.. पुण्यातील नूपुर पिट्टी, जी स्वतःला “औषधमुक्त जीवन प्रशिक्षक” म्हणवते, हिने तिच्या असामान्य डोळ्यांच्या काळजीच्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले.
डोळ्यांचा डॉक्टर ‘मूत्राने डोळे धुणे’ या ट्रीकचा निषेध केला
पुण्यातील नूपुर पिट्टी महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती स्वत:ला “औषधमुक्त जीवन प्रशिक्षक” म्हणवते. तिने डोळ्यांची काळजी घेण्यासाठी असामान्य मार्ग वापरला आहे. “मूत्राने डोळे धुणे, निसर्गाचे स्वतःचे औषध” असे शीर्षक असलेला इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ तिने शेअर केला आहे. तसेत दिवसातील पहिल्या मूत्राने डोळे धुताना दाखवले आहे आणि यामुळे डोळ्यांचा लालसरपणा, कोरडेपणा व जळजळ कमी होते असा दावा केला आहे.
वाचा: बाबा वेंगाचे नवे भाकीत! ‘या’ चार राशींचे नशीब पलटणार, होणार गडगंज श्रीमंत
या व्हिडिओला प्रतिसाद देताना, डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉ. समिता मूळानी यांनी 27 जूनच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले, “तुमचे सकाळचे मूत्र पूर्णपणे स्वच्छ नसते. ते अति-हायड्रेशन, मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. मला माहित नाही की लोकांना या कप्सबद्दल इतके वेड का आहे. ते पूर्णपणे निरुपयोगी आहेत. तुमच्या डोळ्यांना कशातही भिजवण्याची गरज नाही, मूत्र तर सोडाच.”
डोळ्यांची काळजी घेण्याची योग्य पद्धत
पुढे त्या म्हणाल्या, “लोकांना नेमके काय झाले आहे? तुमचे डोळे स्वतःहून स्वच्छ होतात! त्यांना आतून स्वच्छ करण्यासाठी कशाचीही गरज नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, जर कोणाला डोळ्यांचा कोरडेपणा जाणवत असेल, तर पहिली योग्य उपचार पद्धत म्हणजे प्रिझर्व्हेटिव्ह-मुक्त, निर्जंतुक, लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे, जे नैसर्गिक अश्रूंच्या रचनेशी मिळते-जुळते असतात. “डोळ्यांच्या पापण्या आणि पापण्यांभोवती पाण्याने स्वच्छ धुणे आणि मेकअप वापरणाऱ्यांसाठी डोळ्यांसाठी सुरक्षित, तपासलेल्या वाइप्सचा बाहेरून वापर करणे, ही चांगली कल्पना आहे. एवढेच,” असे डॉ. समिता यांनी स्पष्ट केले.