तुम्ही जीममध्ये जाता? या गोष्टी ध्यानात ठेवाच…

| Updated on: Jan 23, 2021 | 2:17 PM

सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाला विशेष वेळ देता येत नाही. यामुळे वजन वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.

तुम्ही जीममध्ये जाता? या गोष्टी ध्यानात ठेवाच...
Follow us on

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीमुळे व्यायामाकडे विशेष देण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे वजन वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. मग अशावेळी डॉक्टर सांगतात व्यायाम कारायला, मग आपल्याला आठवण होते ती म्हणजे जिमची मात्र, काही गोष्टी माहित नसताना आपण कोणताच विचार न करता आपण जिम लावतो परंतू, जिम लावण्याच्या अगोदर काही गोष्टी माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Pay attention to this if you are going to the gym)

डॉक्टरांचा सल्ला
जिम जॉइन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे आहे. मात्र, काही लोक जिम जॉइन करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत यामुळे त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येते

आहाराची काळजी
जेव्हा आपण जिम जॉइन करतो त्यावेळी आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जिममध्ये व्यायाम केल्याने भूक जास्त लागते परंतू त्यावेळेला काहीही खाऊन चालत नाहीतर तुम्हाला जो डायट प्लॅन दिला आहे त्यानुसारच खावे लागते.

पाणी महत्वाचे
निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी पाणी हे सर्वात आवश्यक आहे. दिवसांतून कमीत-कमी 3 ते 4 लीटर पाणी पिने आवश्यक आहे. पाणी आपण जेवढे जास्त पितोल तेवढे जास्त चांगले आहे कारण पाण्याने आपल्या शरिराची त्वचा देखील चांगली होती. जिम जॉइन केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे जिममध्ये गेल्यावर आपल्याला शक्य आहे तेवढेच वजन उचलायचे कारण आपण विनाकारण जास्त वजन उचलले तर त्याचा दुष्पपरिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

संंबंधित बातम्या : 

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

Skin Care | तुम्हीही चेहऱ्यावर साबण लावण्याची चूक करताय? वाचा याचे दुष्परिणाम…

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Pay attention to this if you are going to the gym)