AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | तुम्हीही चेहऱ्यावर साबण लावण्याची चूक करताय? वाचा याचे दुष्परिणाम…

साबण शरीराचे उर्वरित भाग स्वच्छ करण्यासाठी उत्तम कार्य करतो. परंतु, चेहर्‍याची त्वचा नाजूक असल्याने, साबणामुळे ती कोरडी आणि निर्जीव बनवते.

Skin Care | तुम्हीही चेहऱ्यावर साबण लावण्याची चूक करताय? वाचा याचे दुष्परिणाम...
बदामाचा फेसपॅक
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 22, 2021 | 2:27 PM
Share

मुंबई : आपण बाहेरून फिरून येतो, तेव्हा आपल्या त्वचेवर धुळीचा थर जमा होते. अशावेळी पहिला चेहरा धुणे आवश्यक असते. अन्यथा चेहऱ्यावर मुरूमं, डाग अशा समस्या उद्भवतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी लोक बर्‍याचदा आंघोळीसाठी वापरला जाणारा साबणच वापरतात. आपण देखील असेच करत असाल तर थांबा, आतापासून हा साबण चेहऱ्यावर वापरू नका. वास्तविक, चेहऱ्याची त्वचा खूप मऊ असते. साबण शरीराचे उर्वरित भाग स्वच्छ करण्यासाठी उत्तम कार्य करतो. परंतु, चेहर्‍याची त्वचा नाजूक असल्याने, साबणामुळे ती कोरडी आणि निर्जीव बनवते. चेहऱ्यावर साबण लावण्याने काय-काय नुकसान होते, ते जाणून घेऊया…(Skin Care tips for face beauty don’t use soap on face)

PH पातळी असंतुलित होण्याचा धोका

चेहर्‍याची त्वचा शरीरापेक्षा मऊ असते, तर साबणाची प्रकृति क्षारयुक्त असते. अशा परिस्थितीत जर आपण दररोज आपल्या चेहऱ्यावर क्षारीय प्रकृतीचा साबण लावला, तर त्वचेच्या पीएच पातळीमध्ये असंतुलन निर्माण होण्याचा धोका असतो. ज्यामुळे त्वचेचे बरेच नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर साबणाचा वापर हा डिटर्जंटच्या वापरासारखाच आहे.

त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते.

साबण अल्कधर्मी आहे आणि त्यात बरीच रसायने असतात. म्हणून साबणाच्या नियमित वापरामुळे, चेहऱ्याचे नैसर्गिक तेल हळूहळू नाहीसे होऊ लागते आणि त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. यामुळे बर्‍याच चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्या दिसू लागतात (Skin Care tips for face beauty don’t use soap on face).

चेहरा स्वच्छ करण्यासाठी काय वापराल?

त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या सौंदर्यतज्ज्ञाला भेटता तेव्हा ते आपल्याला नेहमी साबणाऐवजी फेसवॉश वापरण्याचा सल्ला देतात. कारण फेसवॉश चेहऱ्याच्या त्वचेचा पोत लक्षात ठेवून खास बनवला जातो. याशिवाय चेहऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी आपण आयुर्वेदिक व खास औषधी वनस्पतींपासून बनवलेले साबण वापरू शकता.

सर्वोत्तम नैसर्गिक उपाय

जर आपल्याला खरोखर आपल्या चेहऱ्याची त्वचा चिरंतन काळासाठी निरोगी ठेवायची असेल, तर नैसर्गिक उपायापेक्षा अधिक उत्तम काहीही नाही. कारण फेस वॉश किंवा काही साबणांमध्ये वापरली जाणारी रसायने त्वचेचे नुकसान करू शकतात. परंतु, नैसर्गिक गोष्टींद्वारे आपला चेहरा सुरक्षित आणि त्वचा निरोगी राहते. नैसर्गिक घटकांमुळे चेहर्‍याला आवश्यक ते पोषण मिळते. ज्यामुळे चेहर्‍याची चमक वाढते आणि त्वचा बर्‍याच काळासाठी चमकदार राहते. चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कच्चे दूध, मसूर डाळीचा फेस पॅक, बेसन पीठाची पेस्ट, कोरफड जेल, मलई-बेसन फेस पॅक वापरू शकता.

(टीप : उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care tips for face beauty don’t use soap on face)

हेही वाचा :

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप