कोरोनाकाळात लोकांनी जाणले योगाचे महत्त्व, ताणताणाव निर्मुलनासह आरोग्यसमस्यांवरचा एकमेव उपाय!

सरतं वर्ष जाता जाता नेहमीच काहीतरी नवीन शिकवण देऊन जाते. 2020 या वर्षाने देखील लोकांना बर्‍याच गोष्टी शिकवल्या.

कोरोनाकाळात लोकांनी जाणले योगाचे महत्त्व, ताणताणाव निर्मुलनासह आरोग्यसमस्यांवरचा एकमेव उपाय!
योगा
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 10:38 AM

मुंबई : नवीन वर्षाच्या आगमनाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरतं वर्ष जाता जाता नेहमीच काहीतरी नवीन शिकवण देऊन जाते. 2020 या वर्षाने देखील लोकांना बर्‍याच गोष्टी शिकवल्या. हे वर्ष जगातील सर्वच लोकांसाठी एक मैलाचा दगड ठरले आहे, असे म्हणता येईल. या वर्षाने लोकांना बऱ्याच गोष्टींचा धडा दिला. कुटुंबाचे महत्त्व, चांगले आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व असे अनेक धडे या वर्षाने लोकांना शिकवले. यावर्षी लोकांना योगाचे महत्त्वही समजले आहे (People knows the power of Yoga during Corona Pandemic).

हे सर्व केवळ कोरोन विषाणूच्या संसर्गामुळे झाले आहे. क्षणाक्षणाचा हिशोब ठेवून पाळणारे हे जग एका कोरोना विषाणूने थांबवले. लोकांना अनेक महिन्यांपासून घरातच राहावे लागले आहे. परंतु हाच काळ होता जेव्हा लोकांना बर्‍याच गोष्टींचे महत्त्व समजले. योगा देखील त्यापैकीच एक होता.

जिमही झाल्या लॉकडाऊन!

खरं तर, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याबरोबर इतर गोष्टींसोबतच जिम देखील बंद झाल्या होत्या. अशा परिस्थितीत दररोज व्यायामशाळांमध्ये जाणाऱ्या लोकांपुढे मोठी समस्या उभी राहिली. तथापि, या परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही आणि घरच्या घरीच त्यांनी रोजच्या नित्यनेमाचे पालन केले. लोक घरीच कसरत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधू लागले. इतकेच नव्हे तर बर्‍याच लोकांनी यावेळी योगा करण्यास सुरुवात केली. आणि आता योगा हा त्यांच्या जीवनाचा एक आवश्यक भाग झाला आहे (People knows the power of Yoga during Corona Pandemic).

योगाला प्रोत्साहन

हा बदल केवळ सामान्य लोकांच्या जीवनातच नव्हे, तर ज्या सेलिब्रिटींसाठी जिममध्ये जाणे आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे खूप महत्त्वाचे होते, त्यांच्या जीवनातही आला. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनीही स्वत:ला घरी तंदुरुस्त ठेवण्याचे घरगुती मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आणि योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरवात केली.

नैराश्यावर मात

लॉकडाऊनमध्येही बर्‍याच लोकांवर प्रचंड ताण आला. बरेच लोक नैराश्यात जाऊ लागले. अशा लोकांसाठी योगा रामबाण औषध उपचार म्हणून काम करू लागला. योगा प्रकारात अशी शक्ती असते, जी लोकांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या शांत आणि उत्साही ठेवते. लोकांना ही शक्ती समजली आणि योगासने त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला. लॉकडाऊननंतर, जिम पुन्हा उघडल्या आहेत. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की घरीच योगा करणे अधिक फायदेशीर आहे. या कोरोना विषाणूच्या साथीने लोकांना जीवनातील योगाची आवश्यकता समजून दिली आहे, असे म्हणता येईल.

(People knows the power of Yoga during Corona Pandemic)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.