परफ्युमचा सुगंध काही वेळातच होतो गायब ? लावताना या चुका बिलकूल करू नका

परफ्युम केवळ सुगंधासाठी नव्हे तर आत्मविश्वास वाढवण्यासाठीही महत्त्वाचा आहे. अनेक जण परफ्युम लावताना काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे सुगंध लवकर नाहीसा होतो.

परफ्युमचा सुगंध काही वेळातच होतो गायब ? लावताना या चुका बिलकूल करू नका
| Updated on: Sep 22, 2026 | 9:46 PM

परफ्युम.. तो फक्त सुगंधासाठी लावत नाहीत तर त्यामुळे लावणाऱ्या व्यक्तीलाही उत्साही, कॉन्फिडंट आणि आतून छान वाटतं. काही लोकांना खास प्रसंगी परफ्युम लावायला आवडतो तर काही लोक रोजच्या, दैनंदिन आयुष्यातही वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम वापरतात. मात्र असं असल तरी बरेच लोकं हे परफ्युम लावाताना काही कॉमन चुका करतात. ज्यामुळे तो फार काळ टिकत नाही आणि त्याचा सुगंध काही वळातच गायब होतो. जर तुम्हालाही परफ्युम लावायला आवडत असेल तर तो लावताना कोणत्या चुका टाळाव्यात हे समजून घ्या. जेणेकरून तुम्ही ती चूक करत असाल तर टाळता येईल.

अत्तराचा वापर खूप पूर्वीपासून केला जातो आणि आता त्याचं स्प्रे वाल्या परफ्युम बॉटलमध्ये रुपांतर झालं आहे. आजही काही लोकं पारंपारिक अत्तारचा वापर करतात, पण बहुतांश लोकं हे सुगंधासाठी परफ्युमच वापरतात. तो स्प्रे करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

कोरड्या त्वचेवर परफ्युम लावणं

अनेक लोकं असे असतात जे डायरेक्ट शरीरावर, त्वचेवर परफ्युम स्प्रे करतात, पण त्यामुळे त्याचा सुगंध लवकर उडून जातो. म्हणूनच परफ्युम लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेला नीट मॉयश्चराईज करणं गरजेचं असतं. त्यामुळे एखादं मॉयश्चरायजर किंवा पेट्रोलिअम जेली वापरा. त्यानंतर परफ्युम फवारा.

कपड्यांवर परफ्युम स्प्रे करणं

बरेच लोकं करतात ती एक चूक म्हणजे ते त्यांच्या कपड्यांवर भरपूर परफ्युम स्प्रे करतात. त्यामुळे तुमचे कपडे लौकर खराब होऊ शकतात. तो परफ्युमचा सुगंध कपड्यांवर जास्त काळ राहत असला तरी कपड्यांवर तो फवाराताना किमान 6 ते 8 इंचाचं अंतर असलं पाहिजे याची काळजी घ्या. तसंच परफ्युम हा त्वचेवर हलकेच स्प्रे करा. त्यामुळे जेव्हा परफ्यूम त्वचेच्या उष्णतेच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याचा सुगंध जास्त काळ टिकून राहतो.

खूप घाम आल्यावर परफ्युम लावणं टाळा

परफ्यूममुळे तुमच्या शरीराला छान सुगंध मिळतो आणि घामाचा दुर्गंध कमी करण्यास मदत होते. पण काही लोक खूप घाम आल्यावर परफ्युम लावतात. ही चूक आवर्जून टाळली पाहिजे. कारण अशा वेळी परफ्यूम लावल्यास त्यात घामाचा वासही मिसळतो आणि त्यामुळे विचित्र दुर्गंध येऊ शकतो.

ओल्या त्वचेवर परफ्युम लावणं

काही लोकं अंघोळ केल्यावर लगेच थेट त्वचेवर परफ्युम लावतात, हेही योग्य नाही. अंघोळ झाल्यावर शरीर स्वच्छ पुसा, त्वाच फक्त थोडीशी ओलसर राहिली पाहिजे. त्याचदरम्यान परफ्युम लावणं हे उत्तम ठरतं. सगळ्यात बेस्ट म्हणजे त्वचेवर मॉयश्चरायझर लावून मग परफ्युम स्पेर करणं. कारण हायड्रेडेट स्कीनवर त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो.

मनगट एकमेकांवर घासणं

परफ्युम लावल्यावर अनेक लोकं मनगट एकमेकांवर घासतात. पण असं करणं टाळावं . कारण त्यामुळे परफ्युमचे मॉलीक्युल्स तुटू लागतात आणि त्याचा सुगंध जास्त काळ टिकत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us