AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : पहिल्यांदा फर्स्ट AC ने प्रवास करताय? मग ‘कॅबिन’ आणि ‘कूप’मधला फरक आधी समजून घ्या!

तुम्ही पहिल्यांदाच फर्स्ट क्लास एसी (First AC) डब्यातून प्रवास करणार असाल, तर एक गोष्ट जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे ‘कॅबिन’ आणि ‘कूप’ यामधला नेमका फरक काय असते?

Indian Railway : पहिल्यांदा फर्स्ट AC ने प्रवास करताय? मग ‘कॅबिन’ आणि ‘कूप’मधला फरक आधी समजून घ्या!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 4:08 PM
Share

भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही, तर देशाच्या हृदयाची धडधड आहे. आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेला ‘देशाची लाइफलाइन’ असं म्हटलं जातं. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात, कारण इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा रेल्वे अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि विश्वासार्ह आहे.

पण जर तुम्ही पहिल्यांदाच फर्स्ट क्लास एसी (First AC) डब्यातून प्रवास करणार असाल, तर एक गोष्ट जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे ‘कॅबिन’ आणि ‘कूप’ यामधला नेमका फरक काय? IRCTC किंवा कोणत्याही तिकीट बुकिंग साइटवरून First AC चं तिकीट काढताना हे दोन्ही पर्याय तुम्हाला दिसतात. या दोन्ही पर्यायाच्या सीट First AC (1A) कोचमध्ये उपलब्ध असतात, पण त्यांची रचना, आणि असन संख्येमध्ये फरक असतो. म्हणूनच, फर्स्ट AC मधील तुमचं अनुभव अधिक चांगला व्हावा, यासाठी ‘कॅबिन’ आणि ‘कूप’ यांची तुलना करणं गरजेचं आहे. या लेखात आपण नेमकं हेच पाहणार आहोत की कॅबिन आणि कूपमध्ये काय वेगळं असतं, आणि तुमच्यासाठी कोणता पर्याय अधिक योग्य ठरेल.

कॅबिन आणि कूपमधील प्रमुख फरक

1. सीट्सची संख्या

कॅबिनमध्ये चार सीट असतात, त्यामुळे एकाच वेळी चार प्रवासी प्रवास करू शकतात. कूपमध्ये फक्त दोन सीट असतात, त्यामुळे फक्त दोन प्रवाशांसाठी ही व्यवस्था असते.

2. प्रायव्हसी

कॅबिनमध्ये चार लोक असतात, त्यामुळे प्रायव्हसी थोडी कमी मिळते. कूपमध्ये फक्त दोन प्रवासी असल्यामुळे अधिक वैयक्तिक आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळतो.

3. कोणासाठी काय योग्य?

कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास करत असाल, तर कॅबिन हा चांगला पर्याय आहे. पण जर तुम्ही कपल असाल किंवा अधिक प्रायव्हसी हवी असेल, तर कूप हा उत्तम पर्याय ठरू शकतो

4. दरवाजा लॉक करण्याची सुविधा:

कॅबिन आणि कूप दोन्हीमध्येच आतून दरवाजा लॉक करण्याची सोय उपलब्ध असते.

बुकिंग प्रक्रिया कशी असते : IRCTC वरून First AC चे तिकीट बुक करताना तुम्ही Coupe किंवा Cabin यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. मात्र, शेवटी सीट अलॉटमेंट हे रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून असते.

जर तुम्ही प्रवासाच्या आधीच रेल्वेच्या Chief Reservation Supervisor (CRS) कडे विनंती केली, तर तुमच्या आवडीनुसार Coupe किंवा Cabin मिळण्याची शक्यता जास्त असते.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.