Hair care : चमकदार आणि मुलायम केसांसाठी घरच्या घरी तयार करा ‘हे’ नैसर्गिक तेल

चमकदार आणि लांब केसांसाठी मालिश करणे खूप फायद्याचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात केस चिकट आणि निर्जीव दिसतात.

Hair care : चमकदार आणि मुलायम केसांसाठी घरच्या घरी तयार करा 'हे' नैसर्गिक तेल
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.

मुंबई : चमकदार आणि लांब केसांसाठी मालिश करणे खूप फायद्याचे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात केस चिकट आणि निर्जीव दिसतात. यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. घामामुळे सारखे केस चिकट होतात, जर आपण दोन दिवसामधून एकदा केस धुतले तर आपली ही समस्या नक्की दूर होईल. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केसांना मालिक करणे अतिशय आवश्यक आहे. (Prepare this natural oil for shiny and soft hair)

आवळा तेल

आपले केस कमी वयात पांढरे होत असतील तर आपण आवळ्याचे तेल केसांना लावू शकतो. यामुळे केस पांढरे होणार नाहीत. आवळ्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात. आवळ्याचे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबपूड, आवळा आणि खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर आवळे बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाबपूड आणि खोबरेल तेल मिक्स करा, गरम करा. हे तेल आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा केसांना लावू शकतो.

कांद्याचे तेल

कांद्यामध्ये सल्फर भरपूर असते, ज्यामुळे केसांच्या समस्यांशी संबंधित अडचणी दूर होतात. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे संसर्ग रोखण्यात मदत करतात. हे तेल तयार करण्यासाठी कांदा चिरून घ्या आणि त्यात 6 चमचे खोबरेल तेल आणि 2 लसूण पाकळ्या घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि थंड होऊ द्या. यानंतर, 3 ते 4 थेंब लव्हेंडर घाला. हे तेल रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि केसांना लावा. एकदा तयार केले हे तेल आपण साधारण आठ दिवस वापरू शकतो.

कोरफडीचे तेल

कोरफडीचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीचे तेल बनविणे खूप सोपे आहे, कोणीही ते सहज घरी तयार करू शकते. हे तेल तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च देखील येत नाही. ताजी कोरफड द्या आणि अर्धा कप खोबरेल तेल घ्या. कोरफड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोरफडीचा बाजूचे काट्याचे भाग चाकूने काढून टाका काढलेली कोरफड आणि तेलाची चांगली पेस्ट करून घ्या. त्यानंतर हे तेल एका बाॅटलमध्ये टाका आणि रोज हे तेल केसांना लावा.

सेन्सिटिव्ह केसांसाठी

सेन्सिटिव्ह केसांसाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय गुणकारी ठरते. हे तेलाबरोबरच केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून देखील काम करते. ऑलिव्ह ऑईलमुळे केस मजबूत होतात आणि केस फाटे फुटण्याच्या समस्येपासून मुक्त होतात. शक्यतो रात्रीच्या वेळेस केसांवर ऑलिव्ह ऑईल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी शॅम्पूने आपले डोके धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

(Prepare this natural oil for shiny and soft hair)