
गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला व्यवसाय म्हणजे वेश्या व्यवसाय… भरतातील अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अशात भारतात वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे की अवैध? याबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित राहिला असेल… भारतात वेश्याव्यवसाय पूर्णपणे कायदेशीर किंवा पूर्णपणे बेकायदेशीर नाही. सेक्स वर्कर म्हणून काम करणं कायदेशीर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मते, त्यांना त्रास दिला जाऊ शकत नाही किंवा अटक केली जाऊ शकत नाही. पण वेश्याव्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी बेकायदेशीर आहेत, जसं की वेश्यागृह चालवणं, वेश्याव्यवसायासाठी एखाद्याचं अपहरण करणं आणि सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्ये करणं.
एका अधिकृत अंदाजानुसार, भारतात 12 लाख हून अधिक लोक सेक्स वर्कमध्ये गुंतलेले आहेत. या लोकांना त्यांच्या व्यवसायामुळे आणि सतत होणाऱ्या तस्करीमुळे भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. तर जाणून घेऊ भारतातील वेश्या व्यवसाय कायदा काय सांगतो…
भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, परंतु काही गोष्टी या व्यवसायात बेकायदेशीर आहेत. रस्त्यावर वेश्याव्यवसाय करणं, वेश्यागृह खरेदी करणं, मालकी हक्क असणं किंवा चालवणं, बाल वेश्याव्यवसाय, मुली खरेदी करणं… या गोष्टी व्यवसायात पूर्णपणे बेकायदेशीर आहेत.
भारतात वेश्याव्यवसाय पूर्णपणे बेकायदेशीर नाही पण त्याचे काही पैलू आहेत. सर्वप्रथम, भारतातील वेश्याव्यवसायाशी संबंधित कायदे काय सांगतो, ते जाणून घेऊ. भारतातील वेश्याव्यवसायाचे नियमन करणारा मुख्य कायदा “अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा – आयटीपीए, 1956” आहे. या कायद्याबद्दल कायदेशीर बोलायचं झालं तर, एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने व्यवसाय करणार असेल, तर ते कोणत्यात प्रकारे बेकायदेशीर नाही. जर कोणाला या व्यवसायात जबरदस्ती आणलं जात असेल तर, ते बेकायदेशीर आहे… त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.
आयटीपीएनुसार, वेश्याव्यवसायासाठी दलाली करणं किंवा एखाद्याला या वेश्याव्यवसायात आणणं तसंच वेश्याव्यवसाय चालवणं… सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना बोलावण्यासाठी एखाद्याला या व्यवसायात भाग पाडणे… जबरदस्ती करणे किंवा फसवणे. अल्पवयीन मुलांना वेश्याव्यवसायात सहभागी करणे बेकायदेशीर आहे.
वेश्याव्यवसाय बेकायदेशीर नाही. परंतु दलालगिरी, संपूर्ण वेश्याव्यवसाय नेटवर्क चालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना आकर्षित करणे यासारख्या संबंधित गोष्टी बेकायदेशीर आहेत.