व्यायाम करताना त्वचेची काळजी अशी घ्या!
व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण व्यायाम केल्याने घाम येतो. दुसरीकडे जर तुम्ही घाम साफ केला नाही तर तुमच्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही रोज जिममध्ये जात असाल तर तुम्ही काही हेल्दी केअर टिप्सचा अवलंब अवश्य करा.

मुंबई: व्यायाम करणं त्वचा आणि शरीर दोघांसाठीही फायदेशीर ठरतं. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचेची काळजी घेताना काही चुका तुमची त्वचा खराब करू शकतात. खास करून व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण व्यायाम केल्याने घाम येतो. दुसरीकडे जर तुम्ही घाम साफ केला नाही तर तुमच्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही रोज जिममध्ये जात असाल तर तुम्ही काही हेल्दी केअर टिप्सचा अवलंब अवश्य करा.
वर्कआउट स्किन केयर टिप्स-
त्वचा स्वच्छ करा
वर्कआउटपूर्वी चेहरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण साफ होते. अशावेळी व्यायाम करण्यापूर्वी आपला चेहरा फेस वॉशने स्वच्छ करावा. असे केल्याने आपल्याला त्वचेचा संसर्ग होत नाही.
सनस्क्रीन लावा
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर सनस्क्रीन जरूर लावा. कारण व्यायाम करतानाही आपल्या त्वचेला संरक्षणाची गरज असते. काही लोकांना असे वाटते की सनस्क्रीनचा वापर फक्त बाहेर पडतानाच केला जातो, परंतु हे चुकीचे आहे कारण सनस्क्रीनचा वापर केवळ उन्हातच नाही तर सावलीतदेखील केला जातो.
चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका
व्यायामादरम्यान चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे. कारण जिम करताना प्रत्येकजण एक्सरसाइज मशीनला हात लावतो. अशा वेळी तुम्हाला इन्फेक्शनचा धोका असू शकतो. त्यामुळे व्यायामा दरम्यान चेहऱ्यावर हात ठेवू नका.
मेकअप लावू नका
काही महिला व्यायामा दरम्यान मेकअप लावतात जे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. अशा वेळी तुम्हाला मुरुम आणि इन्फेक्शनची समस्या होऊ शकते. त्यामुळे व्यायामादरम्यान मेकअप करणे टाळा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
