AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

वायफाय राउटर आता जवळजवळ सगळ्याच घरात पाहायला मिळतो. पण तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की रात्रभर WiFi सुरु ठेवूण झोपणं किती धोकादायक असू शकतं ते. वायफायमुळे नक्की काय गंभीर परिणाम होतात हे पाहाच.

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार
| Updated on: Jan 24, 2025 | 4:03 PM
Share

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे.

त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला 5-6 डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात.तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.

रात्री वायफायचं राउटर बंद करणं किती गरजेच?

मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री लागते. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस हा वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास 99 टक्के लोकं वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून. यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे. का ते पाहु.

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे?

1. जर तुमच्या घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने तुमच्या शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं, आणि याबद्दल बहुतेकांना नक्कीच माहिती नसेल.

2. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे खूप धोकादायक आहेत आणि आपल्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.

3. काही संशोधन असे समोर आलं आहे की वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. 2015 च्या अभ्यासात असे आढळून आले की जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.

4. 2015 च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत . हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो अत्यंत हानिकारक आहे.

5. रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

6. रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.

7. रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.

तर अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणा-या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर तुम्ही वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.