
After Breakup Tips : भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मनधाना( Smriti Mandhana ) अखेर तिच्या पर्सनल लाईफवर सुरु असलेल्या अफवांवर विराम लावला आहे. खूपकाळ म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल ( Palash Muchhal ) याच्यासोबत तिचा लग्न होणार असे म्हटले जात होते. ज्यावर आता स्मृती मनधाना हीने मौन तोडले आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की आता त्यांचे बिनसले असून लग्न तुटल्यात जमा आहे. दोन्ही कुटुंबांनी सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. स्मृती -पलाश यांची लव्ह स्टोरी अशा प्रकारे संपल्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वास्तविक जेव्हा कोणतेही नाते अचानक तुटते तेव्हा केवळ हृदय तुटत नाही तर त्याच्याशी जुळलेली स्वप्नं आणि आशाही विखुरल्या जातात.
Smriti Mandhana – Palash Muchhal
अशा संकटाच्या काळात स्वत:ला सांभाळणे कठीण आणि आव्हानात्मक असते. परंतू जीवन येथेच संपत नाही. हाच विचार, मजबूत इरादे आणि स्वत:वर भरोसा ठेवून माणसाला पुन्हा उभे रहावे लागते. या लेखात आपण पाहूयात…ब्रेकअप किंवा लग्न तुटण्यासारख्या दुर्देवी घटनात स्वत:ला कसे सांभाळावे. मनाला शांत कसे ठेवावे आणि हळूहळू जीवनात पुढे जाण्याची ताकद कमी जमवावी…
Smriti – Palash
लग्न तुटल्यानंतर स्वत:ला कसं सांभाळावे : ५ टीप्स तुमच्या कामी येतील
सर्वात पहिले आणि आवश्यक पाऊल हे आहे की आपल्या भावनांना ओळखणे. या दरम्यान नैराश्य, राग, एकटेपणा वा भीती वाटणे हे सर्व सामान्य आहे. तुम्ही ही आशा करुन लगेच यातून बाहेर याल. रडणे, लिहीणे आणि आपल्या मनातील दु:ख शेअर करणे की हीलिंगची पहिली पायरी आहे.
प्रत्येक जखम भरायला वेळ लागत असतो. लग्न तुटल्यानंतर स्वत:ला लागलीच मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करुन नये. स्वत:ला थोडा वेळ देणे गरजेचे आहे. हळूहळू तुम्ही स्वत:चांगले होऊ शकता.
या कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबिय आणि जवळचे मित्र मोठी ताकद बनू शकतात. आपल्या हृदयाची व्यथा एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीजवळ व्यक्त केल्याने मन हलके होते. एकट्याने सर्वकाही सहन करण्याच्या ऐवजी मदत घेणे ही कमजोरी नाही तर समजदारी आहे.
मेंटल हेल्थ सोबत तुम्ही तुमच्या फिजिकल आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे असते. चांगली झोप घ्या, सकस आहार घ्या, रोज थोडे चालायला जात जा. हलका व्यायाम करा. योग आणि मेडिटेशन सारख्या एक्टीव्हीटी मनाला शांत करण्यास मदत करतात.
रिकामा वेळ डोक्यात जुन्या विचारांनी गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे स्वत:ला बिझी ठेवणे गरजेचे असते. काही तरी नवीन छंद शिकावा, गाणी ऐकावीत. पुस्तके वाचावीत. एखाद्या क्रिएटीव्ह कामात स्वत:ला गुंतवावे. यामुळे हळूहळू मन शांत होते. आणि तुम्ही स्वत:ला जास्त स्ट्राँग अनुभवता. लक्षात ठेवा लग्न तुटणे किंवा ब्रेकअप होणे हा काही जीवनाचा शेवट नाही. काळानंतर दु:ख आपोआप हलके होते. आणि नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा होता. स्वत:वर विश्वास ठेवा, सर्वकाही ठीक होईल.