Social Media | ‘वेळीच लॉगआऊट व्हा! अन्यथा…’, सोशल मीडियावरचा वेळ आरोग्यासाठी घातक!

| Updated on: Oct 18, 2020 | 3:59 PM

फिजिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियापासून दूर राहणे आपल्यासाठी खूप आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

Social Media | ‘वेळीच लॉगआऊट व्हा! अन्यथा...’, सोशल मीडियावरचा वेळ आरोग्यासाठी घातक!
Follow us on

मुंबई : ‘सध्याच्या काळात आपण सर्वांनी आपला बहुतांश वेळ फोनवर घालवला आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?’, या प्रश्नाला आपल्यातील बहुतेकजणांचे उत्तर ‘होय’ असेल. कोरोना साथीच्या काळात, सर्वांनी आपला बराच वेळ सोशल मीडियावर घालवला आहे. परंतु, आता ‘अनलॉक’नंतर आपली जीवनशैली पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आपल्याला वेळेची जाणीव झाली नसली, तरी आता मात्र कामांना सुरुवात झाल्याने वेळेचे महत्त्व कळू लागले आहे. (Social Media surfing time affecting on Mental Health)

कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. घराच्या किराणा सामानापासून ते कपड्यांच्या खरेदीपर्यंत, कार्यालयीन कामांपासून ते शाळेच्या वर्गांपर्यंत सर्व काही ऑनलाईन सुरू आहे.

यादरम्यान आपला बहुतेक वेळ मोबाइलवर माहिती शोधण्यात आणि स्क्रोलिंग करण्यात जातो आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही कामाच्या नसतात. आपण सोशल मीडियाच्या इतके आहारी कसे गेलो, याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? यासगळ्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. काही काळानंतर सोशल मिडियापासून लांब जावेसे वाटते. फिजिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियापासून दूर राहणे आपल्यासाठी खूप आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. याचसाठी आपण सोशल मीडिया वेळीच लॉगआऊट करणे गरजेचे आहे.( Social Media surfing time affecting on Mental Health)

ब्रेक घेणे गरजेचे

क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट नव्या देव म्हणाल्या, सोशल मीडियाचा उद्देश लोकांना एकमेकांशी जोडणे आणि माहिती देणे हा आहे. परंतु, आज आपण स्वतःशी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्याचे विसरलो आहोत. म्हणून, उगाच वेळ वाया घालवण्याऐवजी, या वेळेत काहीतरी उत्पादनक्षम काम करावे. त्या म्हणतात की, जरी आपण डिजिटल स्पेसमधून पूर्णपणे बाहेर पडू शकत नसलो, तरी त्याचा स्वतःसाठी फायदा करून घेऊ शकतो. परंतु, या सगळ्यातून दिवसभरात थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे. (Social Media surfing time affecting on Mental Health)

कोरोनापूर्वी परिस्थिती वेगळी होती. आपल्या सगळ्या कामांचे नियोजन असायचे. मात्र, या काळात जेव्हा आपण सर्व पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहोत, अशावेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे गरजेचे आहे. हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

स्वतःची दिनचर्या बनवा

फिजिओलॉजिस्ट समृद्धी खत्री म्हणतात की, सोशल मीडिया हा केवळ माहितीचा स्रोत आहे. यावर अयोग्य आणि योग्य अशी दोन्ही माहिती मिळते. परंतु, समर्थन कशाचे करावे हे आपल्यावर अवलंबून आहे. या गोष्टी  टाळण्यासाठी आपला दिनक्रम बनवा आणि त्यानुसार गोष्टी करा. या काळात आपल्यात सकारात्मक बदल आणणाऱ्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.( Social Media surfing time affecting on Mental Health)

मागे राहण्याची भीती

नव्या देव म्हणतात की, याकाळात लोकांमध्ये, आपण सगळ्यांपेक्षा मागे राहतो आहोत का, ही भीती सर्वाधिक आहे. लहानपणापासूनच आपल्याला अपडेटेड राहावे, असे शिकवले जाते. जर तुम्ही घाई केली नाहीत, तर मागे राहाल, असे सांगितले जाते. ज्या लोकांना आरामात जगण्याची इच्छा आहे किंवा स्वतःसाठी जगायचे आहे, अशांना आपण कधीही स्वीकारत नाही. यावर त्या म्हणतात की, आपण आपली शर्यत स्वत:हून ठरवायची आणि त्यानुसार आपण कसे चालायचे, याचा सर्वस्वी निर्णय आपणच घेतला पाहिजे. यासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहू नये.

(Social Media surfing time affecting on Mental Health)