AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवेत असतानाच विमानाची खिडकी तुटलेली अन् लटकत होती…; घाबरलेल्या प्रवाशाने काढला व्हिडिओ, गोवा-पुणे प्रवासादरम्यान धक्कादायक प्रकार

आजकाल विमान प्रवास म्हटलं की धडकीच भरते. कारण अशा अनेक घटना घडत असतात की ज्यामुळे हा प्रवास जीवावर बेतण्याची भीती वाटते. असाच एक प्रसंग घडला गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या विमानात.या विमानाची खिडकी चक्क निखळली होती अन् लटकत होती. घाबरलेल्या प्रवाशाने काढलेला हा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत.

हवेत असतानाच विमानाची खिडकी तुटलेली अन् लटकत होती...; घाबरलेल्या प्रवाशाने काढला व्हिडिओ, गोवा-पुणे प्रवासादरम्यान धक्कादायक प्रकार
Spice Jet Flight Window IncidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2025 | 6:17 PM
Share

सध्या विमान प्रवास म्हटलं की डोक्यात नाही ते विचार सुरु होतात. कारण नुकत्याच झालेल्या विमान अपघातामुळे सर्वांनाच इतका धक्का बसला आहे की विमान प्रवास म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एक भीती पसरते. दररोज विमानात काही तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचे दिसून येते.नुताच एक असाच धडकी भरवणारा किस्सा घडला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा विमान प्रवास हा खरंच किती सुरक्षित आहे? असा प्रश्न पडत आहे.

स्पाइसजेटच्या खिडकीच्या चौकटीमुळे प्रवाशांमध्ये घबराट: अलिकडेच गोवा ते पुणे या विमानात खिडकीची चौकट सैल झाली. घाबरलेल्या एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच, एअरलाइन्सने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

विमानाची खिडकी तुटलेली होती आणि ती लटकत होती… अलिकडेच गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-1080) 23 हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळली. त्यामुळे नक्कीच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खिडकीला बाहेरचा म्हणजे आउटर व मधला म्हणजे मिडल असे आणखी दोन प्रकारची आवरणे असल्याने खिडकीतून बाहेरील हवा विमानात शिरली नाही. त्यामुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले.

खिडकीचा संपूर्ण आतील भाग पडला

ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी खिडकीच्या आउटर व मिडल अशा प्रकारच्या आवरणाचा उपयोग होतो. या खिडकीचे इनर प्रकारचे आवरण निघाले. याचा विमानाला तत्काळ धोका पोचत नसला तरी भविष्यात अशा घटनेमुळे विमान प्रवासाला काही धोका निर्माण होणारच नाही हे सांगता येणार नाही. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि डीजीसीएला टॅग करून एअरलाइनला प्रश्न विचारला. प्रवाशाने लिहिले की, ‘विमान उड्डाण करण्यापूर्वी खिडकीचा संपूर्ण आतील भाग पडला आणि आता तेच विमान जयपूरला जात आहे. ते नक्की उडण्याच्या स्थितीत आहे का?’

यावर कपंनीने दिलेलं स्पष्टीकरण

स्पाइस जेटच्या विमानातील एका खिडकीवरील चौकट उड्डाणादरम्यान सैल झाली. ही चौकट ही संरचनात्मक भाग नसून केवळ शोसाठी बसविलेली आहे. त्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेवर किंवा संरचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब पूर्णतः सामान्य होता, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच विमान पुण्यात पोहोचल्यानंतर ही खिडकीची चौकट दुरुस्त करण्यात आली. त्यांनी सांगितले की विमानाच्या खिडक्या मजबूत आहेत आणि त्यात अनेक थर आहेत, त्यामुळे सुरक्षिततेला कोणताही धोका नाही. असंही स्पाइसजेटने सांगितले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दलचा प्रश्न

पण वारंवार विमान प्रवासाच्या येत असलेल्या तक्रारी पाहून प्रवाशांना आता कोणत्याही विमानात प्रवास करताना धोका नक्कीच वाटतो. पण अशा निष्काळजीपणामुळे प्रवाशांनाच त्रास होतो. तसेच त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण होतात.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.