AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snakes Safety Tips : वळवळतच खतरनाक साप घरात येतात… तुमच्या घरात तर नाही ना हे 5 गंध ? आताच…

पावसाळ्यात बऱ्याचदा घरात किंवा बागेत साप येतात. त्यामुळे एक भीती असते मनात. पण हे साप नक्की का येतात आणि कोणत्या गंधामुळे गराकडे आकर्षित होतात ? तुमच्या घरतही हे गंध नाहीत ना ?

Snakes Safety Tips : वळवळतच खतरनाक साप घरात येतात... तुमच्या घरात तर नाही ना हे 5 गंध ? आताच...
या गंधांमुळे आकर्षित होतात साप
| Updated on: Aug 07, 2026 | 3:10 PM
Share

पावसाळा सुरू होताच अनेकदा घर, अंगण आणि बागेच्या परिसरात साप (Snakes) दिसण्याच्या घटना वाढतात. अचानक साप घराजवळ कसे येतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, साप विनाकारण मानवी वस्तीत येत नाहीत. त्यांच्या येण्यामागे आसपास उपलब्ध असलेले अन्न, सुरक्षित लपण्याची जागा आणि काही विशिष्ट वास कारणीभूत असतात. सापांची वास ओळखण्याची क्षमता अतिशय तीव्र असते. ते केमोरिसेप्शन (Chemoreception) या प्रक्रियेद्वारे हवेत असलेले सूक्ष्म कण ओळखतात. जीभ बाहेर काढून ते वातावरणातील वासाचे संकेत घेतात आणि त्याद्वारे शिकार, पाण्याचे स्रोत किंवा सुरक्षित ठिकाण शोधतात. त्यामुळे घराच्या आसपास असलेल्या काही गोष्टी नकळत सापांना आकर्षित करू शकतात.

तुमच्या घराच्या आसपास तर यापैकी काही गोष्टी नाहीत नाते चेक करा आणि असं काही असेल तर ते त्वरित हटवा…

उंदीर आणि कीटकांचा वास

साप घराजवळ येण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे खाद्य. उंदीर, घुशी, बेडूक आणि विविध प्रकारचे कीटक हे अनेक सापांचे प्रमुख भक्ष्य असतात. घराच्या आसपास उंदरांचा वावर असेल, कचऱ्याजवळ अन्नाचे कण असतील किंवा कीटकांची संख्या जास्त असेल तर सापांना तिथे सहज अन्न मिळण्याची शक्यता वाटते. उंदरांची विष्ठा आणि मूत्र यामुळेही सापांना त्या परिसरात शिकार उपलब्ध असल्याचा संकेत मिळू शकतो.

पक्ष्यांची घरटी आणि विष्ठा

बागेत असलेली पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पक्ष्यांची विष्ठा देखील काही सापांना आकर्षित करू शकते. काही सापांच्या प्रजाती पक्ष्यांची अंडी आणि पिल्लांवर अवलंबून असतात. त्यामुळे घराच्या परिसरात पक्ष्यांची संख्या जास्त असेल तर साप तिथे शिकार शोधण्यासाठी येऊ शकतात.

पाळीव प्राण्यांचे उघडं ठेवलेलं अन्न

अनेक जण आपल्या घराबाहेर कुत्रे किंवा मांजरींसाठी अन्न ठेवतात. मात्र, उरलेलं किंवा उघडे ठेवलेले खाद्यपदार्थ यामुळे उंदीर आणि इतर छोटे जीव आकर्षित होऊ शकतात. हे छोटे प्राणी सापांचे भक्ष्य असल्यामुळे अप्रत्यक्षपणे सापही त्या परिसरात येण्याची शक्यता वाढते.

ओलसर जागा आणि गवताळ परिसर

पावसाळ्यात पावसानंतर येणारा मातीचा सुगंध आपल्याला आनंददायी वाटतो, पण सापांसाठी तो परिसरात ओलावा असल्याचा संकेत असतो. पावसाळ्यात जमिनीतील ओलावा वाढतो. ही परिस्थिती सापांसाठी अनुकूल असते कारण ओलसर ठिकाणी बेडूक, गांडुळे आणि इतर छोटे जीव मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच ओलसर माती, दाट गवत आणि झुडपे सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देतात.

कचरा, लाकडांचे ढीग आणि भंगार

नॅशनल पेस्टिसाइड इन्फॉर्मेशन सेंटर (NPIC) च्या माहितीनुसार, घराबाहेर साचलेले भंगार, लाकडांचे ढीग किंवा जुन्या धातूचे स्क्रॅप हे सापांना लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणं वाटतात. अशा ठिकाणी साचलेला कचरा आणि उरलेल्या अन्नाचा वास सापांना केवळ अन्नाच्या शोधात आकर्षित करत नाही, तर त्यांना अंधारी आणि सुरक्षित लपण्याची जागाही उपलब्ध करून देतो. तिथे शिकार मिळण्याची शक्यता असल्याने साप तिथे लपू शकतात.

सापांपासून बचावासाठी काय करावं?

घराच्या परिसरात स्वच्छता ठेवणे, कचरा नियमितपणे हटवणं, गवत आणि झुडपं वेळोवेळी कापणं, अन्नपदार्थ उघडे ठेवणे टाळणे आणि उंदरांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात विशेष काळजी घेतल्यास साप घराजवळ येण्याचा धोका कमी करता येतो.

Follow Us
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला