‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा

उसाचा रस सर्वांनाच आवडतो. त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहे. पण हाच उसाचा रस काही लोकांसाठी नक्कीच नुकसानकारक ठरू शकतो.त्यांनी उसाचा रस पिण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.

या लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
Sugarcane juice
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 12:29 PM

उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला प्राधान्य देतात. शरीराला थंडावा आणि ताजेपणा देणारा उसाचा रस आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे का की तो तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो? जर तुम्हीही विचार न करता तो पित असाल तर नक्कीच थोडं थांबा आणि विचार करा. कारण उसाचा रस तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकतो. पण सगळ्यांसाठीच नाही तर काही लोकांसाठी तर नक्कीच उसाचा रस हानिकारक ठरू शकतो. होय, काही लोकांसाठी उसाचा रस हा विषासमानच असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

जाणून घेऊयात की कोणत्या लोकांसाठी उसाचा रस हा हानिकारक ठरू शकतो ते?

> उसाच्या रसात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. परंतु रस प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. तज्ज्ञांच्या मते उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते. त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते, जी त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

> याव्यतिरिक्त, उसाच्या रसात कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी योग्य नाही. जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

> तसेच उसाच्या रसात साखर मुबलक प्रमाणात साखर आढळते, जी दातांसाठी हानिकारक असू शकते. जर तुमचे दात कमकुवत असतील किंवा तुम्हाला पोकळीची समस्या असेल तर तुम्ही ते सेवन करणे टाळावे.

> उसाचा रस थंड असतो, जो काही लोकांच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकतो. जर तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी सारख्या पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही उसाचा रस पिणे टाळावे.

> उसाच्या रसात पोटॅशियमचे प्रमाण देखील जास्त असते, जे किडनीच्या आजाराच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते. अशा रुग्णांनी हा रस टाळावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.

तर अशापद्धतीने उसाचा रस हा शरीरासाठी फायदेशीर असला तरी तो या लोकांनी पिताना नक्कीच डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.