AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरला मुस्तफिझुर रहमानची रिप्लेसमेंट मिळाली, पीएसएलला ठेंगा

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 28 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी केकेआरला मुस्तफिझुर रहमानची जागा भरून काढायची होती. अखेर केकेआरला त्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरला मुस्तफिझुर रहमानची रिप्लेसमेंट मिळाली, पीएसएलला ठेंगा
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी केकेआरला मुस्तफिझुर रहमानची रिप्लेसमेंट मिळाली, पीएसएलला ठेंगाImage Credit source: PTI
| Updated on: Mar 13, 2026 | 8:44 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 20 सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांची जोरदार तयारी सुरू आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स संघात एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे. मुस्तफिझुर रहमानला संघातून बाहेर काढल्याने ही जागा रिक्त होती. अखेर कोलकात्याला त्याची जागा भरून काढण्यासाठी योग्य खेळाडू मिळाला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी आयपीएल 2026 स्पर्धेत केकेआरकडून मैदानात उतरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 13 मार्चला सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. ब्लेसिंग मुजरबानी 17 मार्चला केकेआरच्या सराव शिबिरात रूजू होणार आहे. त्याला किती रक्कम मिळाली हे मात्र माहिती नाही. पण त्याने पीएसएल 2026 स्पर्धेतून तात्काळ माघार घेतली.

आयपीएल 2026 स्पर्धेत केकेआरचा भाग होण्यापू्र्वी ब्लेसिंग पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणार होता. इस्लामाबाद युनाईटेड संघाने त्याला आपल्या संघात घेतलं होतं. पण आयपीएल स्पर्धेत केकेआरकडून ऑफर येताच त्याने पीएसएलला ठेंगा दाखवला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पीएसएल लिलावात ब्लेसिंग मुजरबानी अनसोल्ड राहिला होता. पण शमार जोसेफच्या ऐवजी त्याला रिप्लेसमेंट म्हणून इस्लामाबाद यूनाइटेडने संघात घेतलं होतं. ब्लेसिंग मुजरबानी दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेत भाग घेणार आहे. यापूर्वी आयपीएल 2025 स्पर्धेत आरसीबी संघाचा भाग होता. आरसीबीने त्याला रिप्लेसमेंट म्हणूनच घेतलं होतं.

ब्लेसिंग मुजरबानी याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी केकेआरने प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आता ब्लेसिंग प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही मात्र सांगता येणं कठीण आहे.  दरम्यान, ब्लेसिंग 17 मार्चला कोलकात्यात येणार आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना 29 मार्चला होणार आहे. दरम्यान, मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने सुमार कामगिरी केली होती.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल