
उन्हाळ्याच्या या ऋतूमध्ये आपण शक्य तितकी ताजी हंगामी फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रकारच्या आहाराचे पालन करून, तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता तसेच तुमच्या आतड्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. या ऋतूत वजन नियंत्रित करणे सोपे असते पण तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या ऋतूत मसालेदार अन्न खाऊ नये, त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळे, कमी मसालेदार पदार्थ आणि उकडलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा. या हंगामात जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तीव्र व्यायाम न करताही वजनावर नियंत्रण राखता येते. यासाठी फक्त या टिप्स फॉलो करणे महत्वाचे आहे.
जलद वजन कमी करण्यासाठी ही हंगामी फळे खा
काकडी, पुदिना आणि दही
उन्हाळ्यात तुम्ही काकडी, पुदिना आणि दह्यापासून बनवलेले रायता देखील ट्राय करू शकता. हे प्रथिने समृद्ध असून यामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि हायड्रेटिंग आहे. तुम्ही दही आणि किसलेली काकडी व त्यात पुदिन्याची पाने मिसळून रायता देखील बनवू शकता. त्यात चिमूटभर मीठ घालून खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारेल. तसेच या रायत्याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, काकडीमध्ये भरपूर फायबर असते आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. हे प्रोबायोटिक अन्न आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
स्प्राउट्स सॅलड खा
स्प्राउट्स सॅलडमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते जे तुम्हाला जास्त खाण्यासारख्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. स्प्राउट्स सॅलडचे अनेक प्रकार आहेत, त्यामुळे तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकता आणि खाऊ शकता. मूग आणि शेंगदाणे उकडलेले किंवा कच्चे खाऊ शकतात. तुम्हाला फक्त त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ मिक्स करून खायचे आहे. या उन्हाळ्यात, प्रथिनेयुक्त सॅलड तुमच्या शरीराला भरपूर पोषण देईल.
नारळाच्या पाण्याची स्मूदी
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यासाठी तूम्ही नारळाच्या पाण्याची स्मूदी करून ही वर्कआउट करण्यापूर्वी किंवा नंतर देखील सेवन करणे परिपूर्ण आहे. नारळाच्या पाण्यात पालक, आणि एक चमचा चिया बिया मिक्स करून स्मूदी तयार करा. हे स्मूदी तुम्हाला दिवसभर उत्साही आणि पौष्टिक ठेवेल.
कलिंगड सॅलड
कलिंगड मध्ये भरपूर पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते. रसाळ कलिंगडाचे तुकडे घ्या आणि त्यावर फेटा चीज, पुदिना आणि नैसर्गिक स्वीटनर बाल्सॅमिक ग्लेझ चिमुटभर टाका, जेणेकरून ते आणखी स्वादिष्ट आणि गोड होईल.
थंडगार भाज्यांचं सूप
व्हेजी सूपमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात जे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात आणि पचन सुधारतात. टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, लसूण आणि ऑलिव्ह ऑइलच्या मिश्रणाने बनवलेला थंड सूप हा एक हलका जेवण आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो.
फळांचं चाट
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी फायबरने समृद्ध असते. यामध्ये कॅलरीज कमी असतात जे तुम्हाला संपूर्ण दिवस ऊर्जावान ठेवतात. तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. यासाठी प्रथम हंगामी फळे घ्या, ती व्यवस्थित कापून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबू घाला. या हंगामात वजन लवकर कमी करणाऱ्यांसाठी हे सॅलड खूप फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)