जास्वंदीच्या फुलांचा चहा उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील उष्णता करते कमी, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

जास्वंदीच्या फुलाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर त्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदातही नमूद आहेत. जास्वंदीच्या फुलापासून बनवलेला चहा आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्ही हा चहा घरी सहज बनवू शकता. चला तर मग आजच्या लेखात जास्वंदीच्या चहाचे आरोग्यदायी फायदे आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.

जास्वंदीच्या फुलांचा चहा उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील उष्णता करते कमी, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
jaswandi tea
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 9:23 PM

आजकाल देशातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेने लोक त्रस्त झालेली आहेत. उष्णतेचा पारा इतका जास्त आहे की उच्च तापमानामुळे थकवा, मानसिक ताण आणि पचनाच्या समस्यांची शक्यता वाढते. त्यामुळे आपण अनेक आरोग्यदायी पेयं व आहार या दिवसांमध्ये घेत असतो. त्याचबरोबर अशा हवामानात आरोग्य तज्ञ जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेल्या चहाला एक नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय मानतात. हा चहा शरीराला थंडावा देतो आणि मानसिक शांती प्रदान करतो. एक कप जास्वंदीचा चहा प्यायल्याने तुमचा मूड ताजातवाना होऊ शकतो आणि शरीराला ताजेपणा व ऊर्जा मिळू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण जास्वंदीचा चहा पिण्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.

आयुर्वेदातही जास्वंदीचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर

सुंदर लाल जास्वंदीच्या फुलाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर त्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदातही आढळतात. आयुष मंत्रालयाच्या मते, जास्वंदीच्या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते.

रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

जास्वंदीचा चहा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. तसेच या चहाच्या सेवनाने रक्तवाहिन्यांना शिथिल करून रक्तदाब संतुलित होतो. शिवाय या चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी होण्यासही मदत होते

हा चहा चयापचय सुधारतो आणि शरीरातील अतिरिक्त पाणी व मीठ बाहेर टाकण्यास मदत करतो. कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक चांगले आरोग्यदायी पेय आहे.

मधुमेहामध्ये आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

जास्वंदीचा चहा रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते असे मानले जाते. याव्यतिरिक्त या चहाने लिवरचे आरोग्य चांगले राखण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत होते.

जास्वंदीचा चहा कसा बनवायचा

जास्वंदीच्या फुलांपासून चहा बनवणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम सुकलेली जास्वंदीची फुले गोळा करा. एका भांड्यात एक ते दीड कप पाणी भरा. त्यात जास्वंदीची फुले टाकून 5 ते 7 मिनिटे उकळवा. तुम्ही ती पाण्यात भिजवूनही ठेवू शकता. चव वाढवण्यासाठी त्यात मध किंवा लिंबाचा रस‍ मिक्स करा. दिवसातून एक ते दोन कप जास्वंदीचा चहा पिणे पुरेसा मानला जातो.

सेवन करण्यापूर्वी काळजी घ्या

नियमितपणे जास्वंदीच्या चहाचे सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गर्भवती महिला, कमी रक्तदाब असलेले आणि नियमित औषधे घेणाऱ्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us