पार्टनर वारंवार करत असेल या 4 चुका तर व्हा अलर्ट! यामुळे होऊ शकतं ब्रेकअप
या चुका वारंवार होत असतील तर त्यांना माफ करून नात्यात पुढे जाणं अवघड होऊन बसतं. मग ही गोष्ट तुमच्या नात्यात भांडणे आणि मतभेदांना कारणीभूत ठरते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पार्टनरच्या कोणत्या चुका रिपीट केल्यानंतर तुम्ही ब्रेकअपबद्दल विचार केला पाहिजे

मुंबई: चुका खूप कॉमन असतात, त्यामुळे कोणीही चुका करू शकतो. अशा तऱ्हेने अनेकदा तुमचा पार्टनर रिलेशनशीपमध्ये राहून ही चूक करू शकतो. पण चूक एकदा झाली तर ती विसरून माफ करणं सोपं असतं. दुसरीकडे या चुका वारंवार होत असतील तर त्यांना माफ करून नात्यात पुढे जाणं अवघड होऊन बसतं. मग ही गोष्ट तुमच्या नात्यात भांडणे आणि मतभेदांना कारणीभूत ठरते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पार्टनरच्या कोणत्या चुका रिपीट केल्यानंतर तुम्ही ब्रेकअपबद्दल विचार केला पाहिजे, तर चला जाणून घेऊया पार्टनरच्या कोणत्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये.
1. कॉल आणि मेसेजला उत्तर न देणे
जर तुमचा जोडीदार तुमचा बहुतांश फोन आणि मेसेजला उत्तर देत नसेल तर याचा अर्थ त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही. अशा परिस्थितीत एकतर्फी संबंध टिकवणे कठीण होऊ शकते. म्हणूनच पुन्हा एकदा या नात्याचा विचार करण्याची गरज आहे.
2. वारंवार खोटे बोलण्याची सवय
विश्वासाच्या पायावर नातं अवलंबून असतं. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल खोटं बोलत राहिला तर नातं हाताळणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे हे नातं टिकवण्यासाठी एकदा विचार करायलाच हवा.
3. फसवणूक
तुमच्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतरही जेव्हा पार्टनर फसवतो, जर तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत असेल तर अशा परिस्थितीत त्याच्यासोबत राहणे तुमच्यासाठी निरर्थक ठरू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जोडीदार कुठेतरी दुसरीकडे गुंतलेला आहे तर ब्रेकअपचा विचार करा.
4. Ex बद्दल बोलत असेल तर…
जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असतानाही आपल्या एक्सला मिस करत असेल किंवा तुमची त्याच्याशी तुलना करत असेल तर तुम्ही यावर आक्षेप घ्यायलाच हवा. जर तुमचा जोडीदार अजूनही तुमच्याशी एक्सबद्दल बोलत असेल तर तुम्ही त्यांच्याशी ब्रेकअप करण्याचा विचार करायला हवा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
