AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bioluminescent Beaches : भारतातील हे 5 समुद्र किनारे रात्रीचे चमकतात, दिसतो विलोभनीय नजारा

फिरण्यासाठी तुम्हाला एखादे युनिक ट्रॅव्हल डेस्टीनेशन हवे असेल तर भारतात काही समुद्र किनारे आहेत. जेथे तुम्ही रात्रीच्यावेळी लाटांमध्ये चमकणारा प्रकाश पाहू शकता. येथे तुम्ही कुटुंबिय, मित्रांसमवेत किंवा सोलो ट्रीप देखील अॅरेंज करु शकता.

Bioluminescent Beaches : भारतातील हे 5 समुद्र किनारे रात्रीचे चमकतात, दिसतो विलोभनीय नजारा
Bioluminescent Beaches
| Updated on: Apr 04, 2026 | 10:47 PM
Share

Bioluminescent Beaches India: भारताचे समुद्र किनारे खूपच सुंदर आहेत. मात्र काही समुद्र किनारे रात्रीचे चमकत असतात. या जादुई किमयेला बायोलुमिनसेंस म्हटले जाते. जेव्हा समुद्राच्या फेसाळात्या लाटांमध्ये निळ्या रंगाचा प्रकाश दिसतो. जणू रात्रीचे तारेच समुद्रात उतरलेले वाटावेत. हे कसली जादू नसते तर छोटे-छोटे मायक्रोऑर्गेनिज्म (प्लँकटन) मुळे हा नजारा दिसत असतो. जेव्हा लाटा उसळतात तेव्हा हा निळा प्रकाश बाहेर पडत असतो. चला तर भारतातील काही समुद्र किनाऱ्यांवर हा सुंदर नयनरम्य सोहळा अनुभवयाला मिळत असतो. तर चला कुठे आहेत हे पाच समुद्र किनारे ते पाहूयात…..

Bioluminescent Beaches

Bioluminescent Beaches

स्वराज बेट (हॅवलॉक आयलँड): स्वराज बेट हे अंदमानातील सर्वात प्रसिद्ध बेट आहे. दिवसाचे हे बेट जितके सुंदर दिसते तेवढ रात्रीचे हे जादुई होऊन जाते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात येथे अंदमानातील सुंदर बिचवर पाण्यात निळ्या रंगाचा प्रकाश चमकताना स्पष्ट दिसतो.खास करुन तुम्ही मॅनग्रोच्या दरम्यान कयाकिंग करत असाल तर..

बंगाराम आयलँड: लक्षद्वीपचे हे आयलँड खूपच शांत आणि स्वच्छ आहे. येथे कधी कधी रात्रीच्या वेळी लाटांमध्ये हलका हलका निळा प्रकाश चमकताना दिसतो. येथे जाण्यासाठी मात्र, खास परवानगी घेऊनच जावे लागते.

बेतालबतिम बिच: गोवा येथील हा बिच थोडा गर्दीपासून दूर आणि शांत आहे. या जागेला सनसेट बिच देखील म्हटले जाते. परंतू खरी मजा तेव्हा येथे जेव्हा रात्री लाटांमध्ये हलका निळा चमकता प्रकाश दिसू लागतो. जणू लाटांमध्ये कोणी हिरे माणकेच टाकली असावीत…

मट्टू बिच: उडुपीच्या जवळ लपलेला हा मट्टू बिच खूपच शांत आणि निर्जन आहे.येथे उन्हाळ्यात कधी-कझी लाटांमध्ये चमकणारा प्रकाश दिसत असतो. त्यामुळे हा बिच खास ओळखला जातो. येथील बिचवर लोक हा निसर्गाचा चमत्कार पाहाण्यासाठी आलेले असतात.

अक्सा बिच: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडच्या जवळ असलेला अक्सा बिच देखील तुम्हाला हा आनंद देऊ शकतो. येथेही शांतता आणि केव्हा केव्हा दिसणारा लाटांमधील प्रकाश खुणावत असतो. बायोल्यूमिनेसेंस एक्टिव्हीटी येथे अनेकदा दिसत असते. तुम्हाला आराम आणि शांतता हवी असेल तर अक्सा बिच देखील एक चांगला पर्याय आहे. कुटुंबासह किंवा मित्रांसमवेत येथे तुम्ही जाऊ शकता.किंवा सोलो ट्रीप देखील अॅरेंज करु शकता.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....