रोज तूर डाळ खाता? मग ‘या’ ५ लोकांनी सावध राहा; आरोग्याला होऊ शकतं नुकसान!

Toor Dal Side Effects: तूर डाळ तुमच्या आरोग्यासोबतच चवीचीही काळजी घेते. आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही लोकांनी तूर डाळ खाणे टाळले पाहिजे. जाणून घ्या कारण

रोज तूर डाळ खाता? मग ‘या’ ५ लोकांनी सावध राहा; आरोग्याला होऊ शकतं नुकसान!
| Edited By: | Updated on: Oct 06, 2026 | 4:15 PM

भात, भाजी आणि पोळी सोबत वरण किंवा डाळ दिल्याशिवाय भारतीय जेवणाची थाळी पूर्ण मानली जात नाही. डाळींमध्ये सुद्धा तूर डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. प्रथिने, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी अनेक पोषक तत्वे तूर डाळमध्ये आढळतात. जे तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या चवीचीही काळजी घेतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही, काही लोकांनी तूर डाळ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्यास त्यांना फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

गॅस, अॅसिडिटी
ज्या लोकांना गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या आहे त्यांची समस्या तूर डाळ आणखी वाढवू शकते. तूर डाळ पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे पोटदुखी, आंबट ढेकर येणे आणि गॅस तयार होणे असे त्रास होऊ शकतात.

Loading...

किडनीचे रुग्ण
ज्यांना आधीच किडनीचा आजार आहे त्यांनी तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असल्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या समस्या आणखी वाढू शकतात. एवढेच नाही तर या डाळीचे अतिसेवन केल्याने पोटात स्टोनची समस्या देखील होऊ शकते.

मूळव्याधचे रुग्ण
जर तुम्हाला मुळव्याधची समस्या असेल तर तुम्ही तूर डाळ खाणे टाळावे. तूर डाळमधील प्रथिने पचणे पचनसंस्थेला खूप कठीण जाते. त्यामुळे पोटात बद्धकोष्ठता निर्माण होऊ लागते आणि व्यक्तीला सकाळी पोट साफ करण्यासाठी जास्त दाब द्यावा लागतो. त्यामुळे मूळव्याधच्या रुग्णांची समस्या वाढते आणि त्यांच्या सूज आणि रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवू लागतात.

यूरिक अॅसिड
ज्या लोकांना आधीच युरिक अॅसिडचा त्रास आहे त्यांनी तूर डाळीचे सेवन करू नये. तूर डाळमधील प्रथिनांच्या मुबलक प्रमाणामुळे शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे व्यक्तीला हातपाय दुखणे आणि सांध्यांना सूज येऊ शकते.

एलर्जी
जर तुम्हाला तूर डाळीची एलर्जी असेल तर चुकूनही ही डाळ खाऊ नका, विशेषतः रात्री. असे केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तूर डाळीमधील प्रथिने, लोह आणि पोटॅशियम हे पोषक तत्व सहजासहजी पचत नाहीत. हेच कारण आहे की ज्या लोकांना तूर डाळीची एलर्जी आहे त्यांना ते खाणे टाळावे.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us