दारूसोबत चखण्याचे हे 5 प्रकार हिट ! तिसरा तर सगळ्यांचा आवडता..
दारूची खरी मजा चखण्यासोबतच येते. भारतीयांना त्यांची ड्रिंक्स ही स्नॅक्ससोबत घ्यायला आवडतात, त्यापैकी हे चखण्याचे हे 5 प्रकार सर्वात लोकप्रिय आहेत. त्यातला तिसरा प्रकार तर सर्वांनाचा आवडतो, जाणून घेऊया सविस्तर..

भारतात, दारू पिण्याचा आनंद केवळ ड्रिंक्समध्येच नाही, तर त्यासोबत असलेल्या चखण्यातही आहे. जेव्हा जेव्हा भारतीय दारू पितात तेव्हा ते त्याची चव वाढवण्यासाठी नेहमीच स्नॅक्सचा आनंद घेतात. चखणा म्हणून सामान्यतः, लोक स्नॅक्स आणि मांसाहारी पदार्थ खाणं पसंत करतात. पण प्रत्येक व्यक्तीचा आवडता चखणा वेगळा असतो. असं असलं तरी काही स्नॅक्स असे असतात जे बहुतांश भारतीय मद्यप्रेमींचे आवडते ठरताना दिसतात. त्यामध्ये काजू आणि सुकामेवा, तसेच तळलेले चिकन आणि पनीर टिक्का यांचा समावेश आहे. हे केवळ अल्कोहोलचा तिखटपणा कमी करत नाहीत तर एक वेगळी चव देखील देतात.
आज, या आर्टिकलमध्ये आपण 5 लोकप्रिय स्नॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे बहुतांश मद्यप्रेमींना आवडतं.त्यातला तिसरा तर मोस्टली सगळ्यांचाच आवडतो. चला टॉप 5 वर टाकूया एक नजर ..
दारू आणि फ्राईड चिकन
जे मांसाहार करतात त्यांना दारूसोबत फ्राईड अर्थात तळलेले चिकन खायला आवडतं, तो एक लोकप्रिय पदार्थ आहे. ते अल्कोहोलसोबत देखील खायला आवडतं कारण ते कुरकुरीत आणि मसालेदार असतं. त्याची हलकी तळलेली आणि मसालेदार चव अल्कोहोलचा आंबटपणा आणि चव वाढवते. मात्र खूप जास्त तेल आणि मसाला असल्याने ते पोटासाठी नुकसानदायकही ठरू शकतं
भुजिया आणि नमकीन
भुजिया आणि हलके खारवलेले म्हणजेच नमकीन पदार्थ हे अल्कोहोलसोबत चांगले जुळतात. त्यांचा मसालेदार स्वाद आणि कुरकुरीतपणा अल्कोहोलची चव वाढवतो आणि पिताना तोंडाचा अनुभव बॅलन्स्ड राखण्यास मदत करतो. त्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि सहज मिळतं म्हणूनही लोकांना ते आवडतं.
खारवलेले शेंगदाणे एकदम लोकप्रिय
खारवलेले शेंगदाणे हे जवळजवळ प्रत्येक मद्यप्रेमीचा आवडता चखणा आहे. ते हलके खारट, खाण्यास सोपे आणि अल्कोहोलची चव बॅलेन्स करतात. त्यासोबत अल्कोहोल पिण्याची एक वेगळीच मजा असते. शेंगदाणे तहान वाढवतात असे मानले जाते, म्हणूनच ते खाल्ल्यामुळे मद्य जास्त प्यायल जातं. म्हणूनच बारमध्येही ते सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या स्नॅक्सपैकी एक मानले जाते.
पनीर टिक्काही लिस्टमध्ये
पनीर टिक्का हा त्याच्या मसालेदार आणि ग्रिल केलेल्या चवीमुळे अल्कोहोलसोबतचा लोकप्रिय ऑप्शन आहे. तो हलका, प्रथिनेयुक्त आणि स्वादिष्ट असतो. पनीर टिक्काची चव, आणि मद्य हे परफेक्ट कॉम्बिनेशन ठरतं. ते खायला जड असत, म्हणूवन ते खाल्ल्यावर मद्य कमी प्यायलं जातं.
मिक्स ड्राय फ्रूट्स
काजू, बदाम आणि मनुका यांसारखे मिक्स ड्राय फ्रूट्स ही चखणा म्हणून लोकप्रिय आहेत. ते हेल्दी असतात आणि सौम्य गोड आणि खारट चवींचा बॅलेन्स राखतात. त्यांच्या मिश्र चवीमुळे दारूची तीक्ष्णता कमी होते. ते बऱ्याचदा दारूसोबत खाल्ले जातात.
