जर तुम्ही सतत तणावात असाल तर दिवसाची सुरुवात करा ‘या’ 5 मार्गांनी

आपल्या अनेक चांगल्या सवयी आपले जीवन सुधारण्यास मदत करतात. त्यात तुमचा संपूर्ण दिवस तुम्ही कसा सुरू करता यावर अवलंबून असते. कारण काही चांगल्या सवयी तुमची ऊर्जा, मनःस्थिती आणि तुम्ही दिवसभर कसे काम कराल हे त्यावर असते. म्हणून, सकाळची योग्य दिनचर्या असणे खूप महत्वाचे आहे. चला तर आजच्या लेखात आपण संपूर्ण दिवस तणाव मुक्त राहावा यासाठी या सवयींचा अवलंब करा.

जर तुम्ही सतत तणावात असाल तर दिवसाची सुरुवात करा या 5 मार्गांनी
सकारात्मक विचार
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 13, 2025 | 3:10 PM

रोजच्या त्याच धावपळीच्या जीवनात ताणतणाव असणे सामान्य आहे. पण जर हाच तणाव तुम्हाला त्रास देत राहिला तर तुमच्या आयुष्यात समस्या येतच राहतात. अशात काही लोकं सुरुवातीला अतिविचारांना बळी पडतात जे तणावाचे रूप धारण करते. जर ते नियंत्रित केले नाही तर कधीकधी परिस्थिती नैराश्याला देखील कारणीभूत ठरू शकते. हा ताण आपल्याला इतका ग्रासतो की आपल्याला रात्री झोप येत नाही. जर झोपेचा दिनक्रम बिघडला तर पुढचा दिवसही खराब होतो आणि तो एक अस्वास्थ्यकर दिनक्रम बनतो जो आपल्याला नको असला तरीही पाळावा लागतो. आता प्रश्न असा आहे की ताण कमी करण्यासाठी आणि आपण आपले जीवन आनंदाने जगण्यासाठी काय करावे?

जेव्हा आपण अधिक ताणतणावात असतो तेव्हा एखादी गोष्टी विसरतो किंवा काही विचारांमध्ये हरवलेले राहतो. जर अशा समस्या असतील तर ते तुमचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे हे दर्शवते. अशातच तुम्ही ही समस्या क्षणार्धात दुरुस्त करणे शक्य नाही पण काही पद्धतींचा अवलंबन करून दुर करता येते. तुमचा दिवस तणावपूर्ण राहू नये म्हणून तुम्ही सकाळची दिनचर्या पाळली पाहिजे. यासाठी अशा काही टिप्स किंवा ट्रिक्स दिनचर्येत अवलंबल्याने आपल्याला त्रास देणारा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण अशा ५ प्रभावी पद्धतींबद्दल जाणून घेऊयात…

5 सवयी ज्या तुम्हाला तणाव मुक्त करतील

सकाळी 5 वाजता उठणे

आपण अनेकदा काही लोकांकडून ऐकले असेल की ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे 4:00 ते 5:00 च्या दरम्यान उठले पाहिजे. लवकर उठल्याने तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो आणि तुम्ही तुमचे सर्व काम शांतपणे सुरू करू शकता.

सकाळी उठल्यावर आधी पाणी प्या

रात्रभर झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्हाला डिहायड्रेशन होते. म्हणून, दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा, ते तुमचे पचन सुधारते आणि शरीराला हायड्रेट करते. असे केल्याने तुमचा मूड सुधारतो, तुमची ऊर्जा वाढते आणि तुम्हाला मानसिक शांती मिळते जेणेकरून तुम्ही दिवसभरात जे काही काम करता त्यावर लक्ष केंद्रित करू शकाल.

सकाळी उठल्याबरोबर फोन वापरू नका

फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून, सकाळी उठल्याबरोबर फोनवरील नोटिफिकेशन तपासण्याची सवय सोडून द्या आणि मोकळ्या हवेत थोडा वेळ घालवा जेणेकरून तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही दिवसाची सुरूवात चांगली करू शकाल.

दररोज काहीतरी लिहा

तुम्हाला जे काही वाटत असेल ते डायरीत लिहा. जर तुमच्या मनात काही सकारात्मक येत असेल तर तेही लिहा की तुम्ही आजचा दिवस कसा चांगला बनवू शकता. लिहिण्याने तुम्हाला तुमच्या भावना कळतील आणि यामुळे तुम्हाला स्वतःला चांगले समजून घेण्यास मदत होईल.

तुमचा पलंग स्वच्छ ठेवा

सकाळी उठल्यानंतर, सर्वात आधी तुमची बेडशीट घडी करा. जरी ही सवय खूपच लहान वाटत असली तरी, ही एक अतिशय पॉवरफूल सवय आहे जी तुमचा मूड सुधारू शकते आणि तणाव कमी करू शकते. असो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जितकी स्वच्छता ठेवाल तितके तुम्हाला बरे वाटेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)