उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांसह मुंबईची ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोअर
परीक्षा संपताच प्रत्येक मुलं बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करतात. कारण अभ्यास आणि ताणतणावाने भरलेल्या दिवसांनंतर, स्वतःला ताजेतवाने करून काहीतरी नवीन एक्सप्लोर करावेसे वाटते. त्यामुळे तुम्ही सुद्धा परीक्षेनंतर मुलांना बाहेरच पण जवळ पास फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर मुंबईत काही ठिकाणे आहेत जी तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील.

मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे. अनेक घरांमध्ये परीक्षा संपल्यावर कुठे फिरायला जायचे याचे प्लॅंनिग सुरू झाले आहे. तुमच्या घरीही ट्रिपचे प्लॅनिंग सुरू झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि परीक्षेनंतर तुमच्या मुलांसोबत मुंबईत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर येथील काही ठिकाणे एक-दोन दिवसात एक्सप्लोर करता येतील.
मुंबई हे असे शहर आहे ज्याला ‘स्वप्नांचे शहर’ म्हटले जाते पण ते फक्त स्वप्नांपुरते मर्यादित नाही तर येथे भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे देखील आहेत. त्याचसोबत मुंबई हे शहर ऐतिहासिक वारसा, सुंदर समुद्रकिनारे, अद्भुत मॉल आणि मनोरंजन स्थळांनी परिपूर्ण आहे. जर तुम्हीही परीक्षेनंतर मुलांसोबत फिरायला घेऊन बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या लेखातुन मुंबईतील 4 सर्वोत्तम पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत, जिथे फिरायला गेल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल.
मरीन ड्राइव्हवरून बघा सुर्यास्त
मुंबईत प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे मरीन ड्राइव्ह. मरीन ड्राइव्ह असे ठिकाण आहे ज्याला ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईतील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला घेऊन जाताय तर मरीन ड्राइव्ह हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. कारण येथे असलेला शांत समुद्रकिनारा , थंड वारा आणि छान असा सूर्यास्त पाहून तुम्हाला अगदी छान वाटेल आणि तुमच्या मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत सुट्टीचा आंनद घ्याल.
जुहू बीच
मुंबईत येणारे प्रत्येक पर्यटक जुहू बीचला भेट देत नाही असे होतच नाही, कारण जुहू बीच केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही तर येथे मिळणाऱ्या स्ट्रीट फूडसाठी देखील प्रसिद्ध आहे. पाणीपुरी, भेळपुरी आणि वडा पाव सारख्या स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घ्या आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घ्या. मुलांच्या परीक्षेनंतर तुम्ही इथे येऊन खूप मजा करू शकता.
कॅनोसा हिल्स
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि तुमच्या मुलांना ॲडवेंचर करायला आवडत असेल तर कॅनोसा हिल्स तुमच्या मुलांसाठी योग्य ठिकाण आहे. मुंबईच्या बाहेरील भागात वसलेले हे एक शांत हिल स्टेशनसारखे ठिकाण आहे, जिथे ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो. येथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दृश्य खूप सुंदर दिसते.
मढ बेटावर शांततेचे क्षण घालवा
जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर शांतपणे बसायचे असेल पण जुहू बीच आणि मरीन ड्राइव्हच्या गर्दीपासून दूर राहायचे असेल, तर मढ बेट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला कमी गर्दी मिळेल आणि तुम्ही शांततेत वेळ घालवू शकाल. येथील समुद्रकिनारा आणि आजूबाजूची गावे एक अनोखा अनुभव मिळतो.