
चाणक्य नीति म्हटली की शत्रूला धोबीपछाड देण्याची कला असा अनेकांचा समज आहे. पण शत्रू आपल्यातही दडला आहे. आपल्या विचारांनी हा शत्रू आपलं भविष्यातील नुकसान करत असतो. याबाबत आचार्य चाणक्य यांनी जीवनातील काही पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. तारुण्यातील चुका म्हातारपणात कशा महागात पडतात याबाबत त्यांनी सांगितलं आहे. उद्योग धंदा आणि तारुण्यातील विचार करण्याची पद्धत कशी मारक ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत याबद्दल सांगितलं आहे. पण काही चुकांमुळे भविष्यात समस्या उद्भवू शकतात. या संदर्भात आचार्य चाणक्य यांनी काही चुकांबद्दल सांगितले ज्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या तरुणपणी करू नयेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत
आचार्य चाणक्य यांच्या मते तुमच्या तारुण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. मिळालेला वेळ चांगला कामात घालवण्याचा प्रयत्न कर किंवा इतरांना मदत करा. जर तुम्ही हा मौल्यवान वेळ तारुण्यात मनोरंजनावर खर्च केला तर तुम्हाला नंतर तुमचे आयुष्य अंधारात घालवावे लागेल. म्हणून तुमच्या तारुण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. इतकंच काय तर वायफळ पैसे खर्च करणे खूप मूर्खपणाचे आहे. जर तुम्ही तरुण असताना विचार न करता पैसे वाया घालवले तर म्हातारपणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला गरिबीत जीवन जगावे लागेल. मरेपर्यंत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. म्हणूनच तरुणपणात पैसे वाया घालवू नका, तसेच भविष्यासाठी त्याचा संचय करा.
कोणत्याही व्यक्तीने तरुणपणीच त्यांच्या उद्योगधंद्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्ही मौजमजेत रमले आणि तुमच्या उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल. म्हणूनच तरुणपणीच तुमचा व्यवसाय योग्य मार्गावर आणणं गरजेचं आहे. तुम्ही तारुण्यातील महत्त्वाचा काळ चुकीच्या मित्रांसोबत घालवू नका. यामुळे तुम्हाला आयुष्यभर त्रास होईल, असे आचार्य चाणक्य म्हणतात.तुम्ही तुमच्या तारुण्यात स्वतःवर नियंत्रण ठेवावे आणि नेहमी चांगली संगत ठेवावी.