
मेकअपमध्ये लिपस्टिकला खूप महत्त्वाचे स्थान आहे. लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात महागडी लिपस्टिक कोणती आहे आणि तिची किंमत किती आहे? या लिपस्टिकची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. चला, या लिपस्टिकबद्दल सविस्तर जाणून घेऊया, जी फक्त मेकअपचा एक भाग नसून एक आलिशान कलाकृती आहे.
जगातील सर्वात महागडी लिपस्टिक म्हणून एच. कॉउचर ब्यूटी डायमंड लिपस्टिक (H. Couture Beauty Diamond Lipstick) ओळखली जाते. तिची किंमत साधारण ११५ कोटी रुपये आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण इतक्या किमतीत तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये दोन-तीन लक्झरी फ्लॅट सहज खरेदी करू शकता. या लिपस्टिकची किंमत तिच्यातील लिपस्टिकमुळे नसून, तिच्या केसमधील वैशिष्ट्यांमुळे आहे. या केसवर १,२०० हून अधिक अस्सल हिरे जडलेले आहेत, ज्यामुळे ती एक अनमोल कलाकृती बनते. एकदा ही लिपस्टिक खरेदी केल्यावर, ग्राहकाला आयुष्यभर रिफिलिंग आणि ब्युटी सर्व्हिस मिळते. त्यामुळे लिपस्टिक संपल्यावर पुन्हा विकत घेण्याची गरज नाही. ही एकप्रकारे कायमस्वरूपी गुंतवणूकच आहे.
गर्लेन ची लिपस्टिक: दुसऱ्या क्रमांकाची महागडी लिपस्टिक म्हणून गर्लेनच्या लिपस्टिकचे नाव घेतले जाते. तिची किंमत सुमारे 51 लाख रुपये आहे. हिचा केस 18 कॅरेट सोन्यापासून बनलेला असून त्यावर 199 हिरे जडलेले आहेत. विशेष म्हणजे, ग्राहक आपल्या आवडीनुसार केसवर आपले नाव आणि डिझाइन कोरून घेऊ शकतात, ज्यामुळे ती पूर्णपणे खास बनते.
स्वारोस्की क्रिस्टल लिपस्टिक: तिसऱ्या क्रमांकावर स्वारोस्की क्रिस्टल असलेली रिफिलेबल लिपस्टिक आहे, जिची किंमत सुमारे ४०० डॉलर (सुमारे 33,000 रुपये) आहे. ही लिपस्टिकही खूप आकर्षक दिसते आणि तिच्यावरील स्वारोस्की क्रिस्टल्समुळे ती वेगळी आणि मोहक दिसते.
या लिपस्टिक्स केवळ मेकअपसाठीच नाहीत, तर त्या लक्झरी आणि खास कलेक्शन आयटम म्हणूनही महत्त्वाच्या आहेत. या लिपस्टिक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा उद्देश केवळ सौंदर्य वाढवणे नसून, एक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू आपल्या संग्रही ठेवणे हा असतो. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, सौंदर्यप्रसाधनांच्या जगातही लक्झरी आणि कला यांचा एक खास मिलाफ दिसून येतो.